Rabi subsidy 2025 : रब्बी अनुदानासाठी 11,000 कोटीचा निधी मंजूर- शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार मदत

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीला सामोरे गेलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर रब्बी हंगामासाठी हेक्‍टरी 10,000 रुपयाच्या निधी अनुदानाच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2025 रोजी एकूण 11 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हे मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की पुढील 15 दिवसांमध्ये अनुदान वितरण प्रक्रिया सुरू होऊन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

खरीप 2025 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यावेळी सरकारने एकूण 32 हजार कोटीची विशेष पॅकेज जाहीर केले होते परंतु आतापर्यंत फक्त 8 हजार 400 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आले होती आता रब्बी हंगामात मंजूर झालेल्या या नव्या निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे आतापर्यंत 40 लाख शेतकऱ्यांना अंदाज 4 हजार 200 कोटी ची मदत मिळाली आहे मात्र अजूनही 50% टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्याची मदत बाकी आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे

फळबाग योजनेत मिळणार 100% अनुदानावर खत

सोलर पंप योजना

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही फडणवीस

बुलढाणा जिल्ह्यात थकीत पिक विमा वितरण सुरू

कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्र अपलोड प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांनी जाणून घ्‍या संपूर्ण माहिती

कृषी यांत्रिकीकरण यादी 2025 : ट्रॅक्टर व कृषी अवजारावर शासनाचे आकर्षक अनुदान

ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply

अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विमा वाटप अपडेट 2025 | शेतकऱ्यांसाठी मोठी मदत सुरु

पीएम किसान योजनेचे नवीन नोंदणी कशी करावी | Pm Kisan new Farmer Registration 2025

हेक्‍टरी 10,000 रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर

रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आलेले हे अनुदान हेक्टरी 10 हजार रुपये पर्यंत देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना खरीप नुकसानीबद्दल अपुरी मदत मिळाली होती किंवा अजिबात मदत मिळाली नाही अशांना या नव्या टप्प्यात समाविष्ट केले जाणार आहे

हे अनुदान दोन टप्प्यात वाटप केले जाणार आहे

पहिला टप्पा : ज्या शेतकऱ्यांचे Agristack (farmer ID) पूर्ण आणि मंजूर आहेत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाणार आहे

दुसरा टप्पा : ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांचे फार्मर आयडी (farmer ID) अद्याप अप्रोव्ह नाहीत त्यांना KYC पूर्ण केल्यानंतर अनुदान मिळणार आहे

93 लाख शेतकऱ्यांना सामावेश अपेक्षित

संपूर्ण राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत मात्र पोर्टल वरील काही तांत्रिक अडचणीमुळे जसे की दुबारा गट नंबर वारसाची माहिती नसणे किंवा अपुरी नोंद अशा काही शेतकऱ्यांची माहिती अजून अपडेट झालेली नाही सध्या 80 टक्के शेतकऱ्यांची माहिती पोर्टल वर अपलोड झाली आहे आणि उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांची 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहेत त्यांनी कार्यालय किंवा कृषी कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह माहिती सादर करणे अत्यावश्यक आहे

शेतकऱ्यांनी काय करावे

  • तुमचा फार्मर आयडी Agristack ID तयार झाला आहे का
  • बँक खाते आधार लिंक आहे का तिची खात्री करा
  • तलाठी कार्यालयात आवश्यक माहिती 31 ऑक्टोंबर पूर्वी जमा करा
  • अपूर्ण माहिती किंवा केवायसी (kyc) नसल्यास त्वरित पूर्ण करा
  • यामुळे प्रक्रिया नंतर पात्र शेतकऱ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होईल

अनुदान वितरणाची संभाव्य रक्कम

राज्य शासनाने केलेल्या नव्या निधी मंजुरीनंतर एकूण अनुदान अनुदान वितरणाची रक्कम 19 हजार कोटी वर पोहोचली आहे या निधीतून पात्र शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजार रुपये पर्यंतचे रब्बी अनुदान आणि खरीप नुकसानीसाठी उर्वरित रक्कम वितरित केले जाणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे

शेवटचा निष्कर्ष

शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या रब्बी हंगामाच्या अनुदान अखेर मंजूर झाले असून आता प्रत्यक्ष थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्य शासनाने दिलेला हा निर्णय निश्चित शेतकऱ्यांसाठी आर्थिक सौंदर्याचा किरण करणार आहे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवसात अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्या संदर्भात पुढील अपडेट लवकरच मिळेल

Leave a Comment