राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि खरीप 2024 चा पिक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे नुकत्याच आलेल्या अपडेट नुसार दोन हेक्टरच्या मर्यादित मध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये या याद्या प्रसिद्ध झाल्या असून निधी वितरण प्रक्रिया वेग आला आहे
पिक विमा 2024 वाटप सुरू
खरीप 2024 : मधील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, आणि कापूस या पिकाचे वैयक्तिक क्लेम मंजूर करण्यात आले आहे नांदेड, बीड, जालना, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होऊ लागले आहेत काही शेतकऱ्यांना 500 ते 3,000 रुपये इतकी रक्कम मिळाली आहे तर काही ना पुढील टप्प्यात आणखीन पेमेंट मिळणार आहे सध्या हा वैयक्तिक क्लेम आधारित विमा आहे राज्यशासनाकडून ईल्ड बेस पिक विमा 100% नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी अद्याप मंजूर झालेला नाही यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात State subsidy pending असे दिसत आहे
अतिवृष्टी नुकसान भरपाई ची सध्याची स्थिती
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांचा निधी राज्यात वाटपासाठी आला आहे या रकमे मधील 8 हजार 500 रुपये प्रति हेक्टर चे सहाय्य एनडीआरएफच्या निकषानुसार दिले जात आहे हे अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादित असून जास्तीत जास्त 17 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात
राज्यशासन आणखीन एका टप्प्यात एक हेक्टर पर्यंत वाढीव मदत देण्याचा विचार करत आहे त्यासाठी वेगळा जीआर (GR) जाहीर केला जाणार आहे तसेच रब्बी हंगाम 2025 साठी चे अनुदान (10 हजार रुपये प्रति हेक्टर) वेगळ्या लेखाशीर्षकाखाली दिले जाईल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
- ज्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत त्यांना अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात मिळणार आहे
- ज्यांना फार्मर आयडी (farmer ID) नाही त्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर मोफत केवायसी (KYC) करावी कोणतेही शुल्क आकारल्यास तहसील कार्यालयात तक्रार करावी
- आपले नाव यादीत नसेल तर आपल्या तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकता संपर्क साधून सातबारा पासबुक आणि फार्मर आयडी सादर करावा
नुकसान भरपाई अनुदान यादी KYC करा
पूर्णता : बाधित तालुके व पात्रता Crop Loss Compensation 2025
राज्यातील ज्या तालुक्यांना 100% नुकसान ग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे 50% ते 60% नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी 5 पाच ते 7 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने मदत जात आहे
पुढील अपडेट रब्बी हंगाम अनुदान व नवा पिक विमा
राज्य शासनाने केंद्राकडे Crop Loss Compensation 2025 पॅकेज पाठवले आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना 17 हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिक विमा देण्याचा प्रस्ताव आहे मात्र यासाठी कापणीची आकडेवारी पूर्ण होऊन जानेवारी 2026 नंतर अंतिम निकाल येणार आहे
निष्कर्ष : सध्या शेतकऱ्यांना खरीप 2024 पिक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळू लागले आहे मात्र शेतकऱ्यांनी आपली यादी तपासावी केवायसी (kyc) पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी पुढील काही आठवड्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची शक्यता आहे जॉईंट फेसबुक ग्रुप





