UP बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल आज जाहीर होणार! आता प्रतीक्षा महाराष्ट्र बोर्डाची; जाणून घ्या SSC-HSC निकालाची लेटेस्ट अपडेट.10th SSC UP Board Exam Result 2026

UP बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल आज जाहीर होणार! आता प्रतीक्षा महाराष्ट्र बोर्डाची; जाणून घ्या SSC-HSC निकालाची लेटेस्ट अपडेट.SSC HSC UP Board Exam Result 2026

10th SSC UP Board Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्चमध्ये पार पडल्या. दहावी (SSC) परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि बारावी (HSC) परीक्षा १० फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत पार पडल्या.

आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. या सर्वात उत्तर प्रदेश बोर्डाने निकालाच्या बाबतीत बाजी मारलीय. यूपी बोर्डाचा निकाल उद्या म्हणजेच 23 एप्रिलला जाहीर होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (UPMSP) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी (हायस्कूल) आणि बारावी (इंटरमीडिएट) बोर्ड परीक्षांचा निकाल उद्या, म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता अधिकृतपणे घोषित केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे.

आपका Result निचे दिये हुए लिंक पर चेक करे

https://upresults.upmsp.edu.in/ResultSearchModel/HighSchool?startYear=2003&endYear=2006

उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाने अखेर निकालाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, उद्या दुपारी 4 वाजता प्रयागराज येथील मुख्यालयातून निकालाची घोषणा केली जाईल. निकाल जाहीर होताच त्याची लिंक बोर्डाच्या अधिकृत पोर्टलवर सक्रिय केली जाईल.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेळेची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच सर्व्हरवर येणारा ताण लक्षात घेता, शिक्षण मंडळाने पर्यायी लिंक्सची सोय देखील केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना निकाल पाहताना तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

विद्यार्थी घरबसल्या आपला निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.होमपेजवर ‘UP Board High School Result 2026’ किंवा ‘UP Board Intermediate Result 2026′ या लिंकवर क्लिक करा.तुमचा रोल नंबर (Roll Number) आणि शाळा कोड (School Code) अचूकपणे प्रविष्ट करा.’Submit’ बटनावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट किंवा डिजिटल प्रत (Screenshot) जतन करून ठेवा.

परीक्षेचे स्वरूप

2026 च्या या बोर्ड परीक्षेत उत्तर प्रदेशातील लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बोर्डाच्या कडक देखरेखीखाली आणि सीसीटीव्ही निगराणीत या परीक्षा पार पडल्या. यंदा उत्तरपत्रिकेच्या तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, पारदर्शकता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल अधिक सुधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मार्कशीटची अपडेट

ऑनलाइन निकाल हा केवळ तात्पुरत्या माहितीसाठी असतो. विद्यार्थ्यांना त्यांची मूळ गुणपत्रिका (Original Marksheet) त्यांच्या संबंधित शाळांमधून काही दिवसांनंतर प्राप्त होईल. इंटरनेटवरील निकालात जर काही त्रुटी आढळली (जसे की नावाचे स्पेलिंग किंवा गुणांची चूक), तर विद्यार्थ्यांनी तातडीने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा बोर्डाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांना फेरतपासणीची संधी

जे विद्यार्थी आपल्या गुणांवर समाधानी नसतील किंवा ज्यांना वाटत असेल की त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, त्यांच्यासाठी बोर्ड फेरतपासणी (Scrutiny) आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येतील. यासाठी ठराविक शुल्क भरावे लागते.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

निकाल कोणताही असो, विद्यार्थ्यांनी खचून न जाता सकारात्मक राहावे. केवळ एका परीक्षेचे गुण तुमचे संपूर्ण आयुष्य ठरवू शकत नाहीत, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आलाय. अपयश आल्यास निराश न होता ‘पुरवणी परीक्षेच्या’ (Compartment Exam) माध्यमातून पुन्हा संधी उपलब्ध असते. पालकांनी देखील आपल्या पाल्याला निकालाच्या काळात मानसिक पाठबळ द्यावे आणि त्यांच्या गुणांची तुलना इतरांशी करणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment