शेतकरी बांधवांना शिवराय आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आले आहे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला खरीप पिक विमा 2024 अखेर बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे
600 पेक्षा जास्त रकमेचा पिक विमा मंजूर
खरीप हंगाम 2024 साठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी याआधीच सुमारे 334 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित होते शेतकरी बांधवांनी अनेकदा शासन आणि विमा कंपनीकडे पाठपुरवठा पाठपुरावा करून सुद्धा निधी वितरित विलंब होत होता
शासनाकडून पूरक अनुदान आणि पाठपुरावा
राज्य शासनाने या पीक विमा योजनेसाठी आवश्यक पूरक अनुदान 2 हाजार 19 कोटी रुपये विमा कंपनीकडे हस्तांतरित केले होते त्यानंतर अशी अपेक्षा होती की उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल मात्र काही काळ या प्रतीक्षेत अडथळे आले त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर सुरता महाले आणि जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी या विषयावर सतत पाठपुरावा आणि आंदोलन केले शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर अखेर शासन आणि विमा कंपन्यांनी याचा चर्चेतून सकारात्मक निकाल काढा लागला आहे
212 कोटी रुपये चा पिक विमा वितरणास सुरुवात
सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 212 कोटी रुपयांचा निधी पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे या रकमेचा थेट लाभ 68 हजार पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हळूहळू जमा होत आहे त्यामुळे अद्याप ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये बँक खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी काही दिवस लागतात पण वितरणाची प्रक्रिया सुरू आहे हे निश्चित आहे अजूनही 40 ते 45 % शेतकऱ्याचा विमा बाकी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही सुमारे 40 ते 45 टक्के शेतकऱ्यांचा पिक विमा वाटप बाकी आहे मात्र सध्या सुरू असलेल्या वितरणा मुळे उर्वरित निधी लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे शासनाने आणि विमा कंपनीने एकत्रितपणे काम करून सुरू केल्यामुळे आता वितरण प्रक्रियेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे
इतर जिल्ह्यांना लवकरच अपडेट
बुलढाणा राज्यातील इतर अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा वितरणाच्या प्रतीक्षेत आहे ज्या ज्या जिल्ह्यात शासन किंवा विमा कंपनीकडून अद्यावत माहिती मिळेल ती माहिती पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या बँक खाते क्रमांक आणि आधार लिंक स्थिती तपासून ठेवावी जेणेकरून रक्कम जमा होण्यास कोणतेही अडथळा येऊ नये
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
बँक खाते आधार लिंक आहे का हे तपासा पिक विमा आजचा प्रिंट किंवा अर्ज क्रमांक जवळ ठेवा खात्यात जमा झालेली रक्कम तपासण्यासाठी आपल्या बँक शाखेत संपर्क साधा ग्रामसेवक किंवा कृषी अधिकाऱ्यांमार्फत माहिती मिळवा शेतकऱ्यांना दिलासा मिळवण्याची वेळ खूप दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावणारा हा निर्णय घेतला गेला आहे या वितरणा मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून खरीप हंगामात या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होणार आहे
निष्कर्ष : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा 2024 चे वितरण सुरू होणे हा मोठा दिलासादायक निर्णय आहे ते बारा कोटी रुपयांच्या निधीचे वितरण झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे आता उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर चांगली बातमी मिळेल अशी आशा आहे आपण सर्व आपल्या ग्रामपंचायत कृषी विभाग आणि बँक खात्यात शाखेशी नियमित संपर्क ठेवून अद्यावत माहिती मिळवावी हीच प्रार्थना





