राज्य शासन व केंद्र शासन यांच्या विविध योजनेच्या अभिसरणातून कृषी समृद्धी योजना राज्यात राबवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड, ठिबक तुषार सिंचन, शेततळे, पॅक हाऊस, शेडनेट हाऊस यासारख्या विविध योजनेचा लाभ दिला जात आहे योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर चालते म्हणजे शेतकरी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्र अपलोड करतात त्यांनाच प्रथम लाभ मिळतो DownLoad Documents in PDF
Download Documents in PDF महाडीबीटी वर कागदपत्र अपलोड सुरू
राज्यातील 32 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टल वर पात्र ठरले आहेत याच अर्जदारांना आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज पाठवले जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो कोणती कागदपत्रे अपलोड करायची कोणत्या योजने साठी काय लागणार आहे पूर्वसंमती नंतर कोणती कागदपत्रे द्यायची
या लेखात आपण प्रत्येक योजनेसाठी लागणारे कागदपत्र सविस्तर पाहू या
कृषी यांत्रिकीकरण योजना (RKBY/MIDH राज्य पुरस्कृत)
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर अवजारे पंपसेट, थ्रेशर इत्यादी आजारासाठी अनुदान दिले जातात
- आवश्यक कागदपत्र
- यंत्राचं टेस्ट रिपोर्ट (HP आणि मॉडेल सह)
- कोटेशन (त्या यंत्राचं त्याच एचपी आणि मी मेकच असणं गरजेचं)
- ट्रॅक्टरचं (आरसी बुक लाभार्थ्याच्या नावावर नसल्यास नाकारत दाखला आणि रेशन कार्ड)
- अधिकृत विक्रेते याचं प्रमाणपत्र Dealer Certificate (Dealer Certificate)
- हमीपत्र
- आधार कार्ड
- आधार लिंक असलेला बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र (जर आरक्षण प्रवर्गातून अर्ज असेल तर)
- स्वयंघोषणापत्र एपिडेव्हिट (नावाचा फरक असल्यास)
पूर्वसंमती नंतर : लागणारी कागदपत्र अधिकृत विक्रेते GST बिल डिलिव्हरी, चलन पेमेंट पावती, RTGS जमिनीचा मुद्दा आरोग्य कार्ड (Soil Health Card)
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा दिलासा वितरण सुरू
ठिबक व तुषार सिंचन योजना
ठिबक तुषार सिंचनासाठी अनुदान मिळवणार्या शेतकऱ्यांसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे
- कोटेशन
- हमी पत्र संमती पत्र (सामायिक खातेदार असल्यास) स्वयंघोषणापत्र अपाक /जात प्रमाणपत्र
- आधार लिंक बँक पासबुक
पूर्वसंमती नंतर : अधिकृत विक्रेतेत्याचं GST बिल सूक्ष्म सिंचनाचा आराखडा अधिकृत विक्रेत्याचे नोंदणी प्रमाणपत्र
शेततळे अस्तरीकरण योजना
- शेतकऱ्यांसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे
- कोटेशन हमीपत्र वितरकचा प्रमाणपत्र संमतीपत्र (सामायिक असल्यास)
- स्वयंघोषणापत्र /जात प्रमाणपत्र
- आधार लिंक बँक पासबुक
- पूर्वसंमती नंतर : प्लास्टिक शीटचं GST बिल
- RTGS पावती
- काम पूर्ण झाल्याचा अव्हान
हरितग्रह/ शेडनेट हाऊस योजना
हरितगृह उभारणी साठी लागणारे कागदपत्र :
कोटेशन टेस्ट रिपोर्ट /BIS प्रमाणपत्र
उत्पादन कंपनी किंवा सेवा पुरवठाच प्रमाणपत्र
चतुर सीमा नकाशा
हमीपत्र आणि बंधपत्र
पाणी तपासणी अहवाल
स्वयंघोषणापत्र /जात प्रमाणपत्र/ आधार लींक बँक पासबुक
पूर्वसंमती नंतर : प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र (३ ते ५ दिवसाचा)
सेवा पुरवठादार याचा हमीपत्र (५०० स्लॅम्पवर)
GST बिल व र्टग्स पावती
पॅक हाऊस योजना
या योजनेअंतर्गत ४ लाख रुपये पर्यंत त्याचा प्रकल्प असून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचा अनुदान मिळेल Pack House document PDF
आवश्यक कागद पत्र :
- हमीपत्र
- बंद प्रमाणपत्र
- अंदाज पत्रक व चतुरसीमा नकाशा
- संमतीपत्र /स्वयंघोषणापत्र /जात प्रमाणपत्र
- आधार लिंक बँक पासबुक
पूर्वसंमती नंतर : अधिकृत विक्रेते जीएसटी बिल
- RTSG पावती
- तांत्रिक प्रशिक्षण प्रमाण पत्र
फळबाग लागवड योजना (भाऊसाहेब फोडणकर योजना )
डाळिंब, द्राक्ष, लिंबू, मोसंबी, संत्रा यासारख्या फळबाग लागवडीसाठी
एमआरजीएस अंतर्गत पात्र नसल्याचे प्रमाणपत्र
संमतीपत्र/ स्वयंघोषणापत्र /जात प्रमाणपत्र
हमीपत्र व आधार लिंक बँक पासबुक
माती परीक्षण अव्हाल लिंबूवर्गीय पिकांसाठी आवश्यक
पूर्वसंमती नंतर रोपवाटिकेचे बिल (शासकीय मान्यताप्राप्त )
खड्डे खोदण्याचे बिल
रासायनिक किंवा सेंद्रिय खत खरेदी बिल
पीक संरक्षण व नांगरणीचं बिल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सूचना : घाईघाईत कागदपत्र अपलोड करू नका योग्य कागदपत्रे वाचूनच अपलोड करा कोटेशन व टेस्ट रिपोर्ट एकाच यंत्रांसाठी त्याच HP व मॉडेलच असणं आवश्यक आहे ट्रॅक्टरचा RC बुक एकाच कुटुंबातील सदस्याच्या नावावर वापरा पूर्वसंमती आल्यानंतरच खरेदी करा अन्यथा अनुदान अडकू शकतो तीन पर्यंत घेतलेले अवजार विकायचं नाही अन्यथा पुढील पाच वर्षाकरिता आधार व फार्मर आयडी ब्लॉक केला जाऊ शकतो 6% फक्त 15 % शेतकऱ्यांचा कागदपत्र अपलोड केले आहेत उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आपलोड प्रक्रिया पूर्ण करावी
निष्कर्ष : कृषी यांत्रिकीकरण फळबाग सिंचन हाऊस किंवा हरितगृह या सर्व योजना कागदपत्र प्रक्रिया महत्त्वाची आहे ज्यांनी वेळेस सर्व कागदपत्र अपलोड केली आहेत त्यांचाच पूर्व संमती मिळत असून पुढे अनुदानाचा लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर वेळ वाया घालू नका mahadbt former portal वर लॉग इन करून त्वरित कागदपत्र अपलोड करा कृषी विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन आपल्या शेतीला आधुनिक कडे न्या





