Nuksan Madad Vitran : सप्टेंबरतील अतिवृष्टी नंतर 4 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बँक खात्यात रक्कम जमा सुरू

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार लाखावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आता त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यकडून 317 कोटी 15 लाख 77 हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे सोमवार दिनांक 20 पासून वितरण सुरू करण्यात आले त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 99 हजार 806 हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान समोर आले त्यामध्ये मका, सोयाबीन, भात,कांदा,द्राक्ष,डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले होते

शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनामा नुसार जिल्ह्यात पंधराही तालुक्यातील 4 लाख 9 हजार 474 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता राज्य शासनाने 317 कोटी 15 लाख 77 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच बरोबरच सोमवारी 20 ता आठवड्यात पहिल्याच दिवशी कागदपत्राची पूर्तता असलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाईची रक्कम जमा होत आहे मात्र दिवाळीमुळे पुढील दोन दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे परिणामी काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे

वर्ग रक्कम जमा केल्यास बँकांवर कारवाई

शासनाने केलेल्या मदतीची रक्कम ही बँकेकडून परस्पर कर्ज खात्यावर वर्ग केले जाण्याची अथवा कर्जाचे हप्ते टाकल्याने बँकेकडे रोखून धरली जाण्याचे चिंता शेतकऱ्यांना सतवत होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी जिल्हा राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेचे व्यवस्थापक साठी आदेश काढले आहे या आदेशात कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यास बंधने घालण्यात आली आहेत त्याच्यात रक्कम रोखणे ही मनाई केली आहे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर थेट आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिला आहे

Leave a Comment