सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणी सुरू मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे आपल्या सरकारकडून सोयाबीन हमीभावाने खरेदी (soybean MSP) करण्याची घोषणा करण्यात आली आहे यासाठी 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन शासन ठरवल्या आणि हमीभावाने (minimum support price) थेट खरेदी करण्यात येईल
हमीभावाने खरेदी म्हणजे काय
हमीभाव म्हणजे सरकारने ठरवलेला असा दर यापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना आपला माल विकू नये जर बाजारात दर कमी असतील तर तरी सरकार ठराविक दराने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान टाळता येते आणि त्यांना योग्य मोबदला मिळतो सोयाबीन साठी
सरकारकडून ठरवलेला हा आणि भाव शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणारा ठरेल
नोंदणी प्रक्रिया कधी आणि कशी होणार
नोंदणी सुरू होणार : 30 ऑक्टोंबर 2025 पासून
प्रक्रिया : ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून
खरेदी : शासनाने मंजूर केलेले हमीभाव केंद्रे
शेतकऱ्यांनी आपली नोंदणी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर करायची आहे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होईल त्यांचे सोयाबीन NAFED व इतर सरकारी संस्थेकडून थेट खरेदी केले जाईल नोंदणी झाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल खरेदी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातील
महात्मा फुले 50 टक्के अनुदान योजना
बँक कर्ज घेणे झाले होते
कृषी यांत्रिकीकरण योजना सोडत यादी पहा सविस्तर
अतिवृष्टी नंतर राज्य शासनाचे मदत सुरू
10 वस्तूचा संच बांधकाम कामगार योजना
पेन्शन धारकांसाठी मोठी अपडेट
मुख्यमंत्री त्यांचे शेतकऱ्यांना आव्हान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकू नये शासन ठरवलेल्या हमीभाव केंद्रावरच विक्री करावी हे आव्हान योग्य आहे कारण सध्या बाजारात व्यापारी कमी दर देतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो जर शेतकऱ्यांनी संयम ठेवून शासनाच्या केंद्रावर सोयाबीन विकलं तर त्यांना MSP चा पूर्ण फायदा मिळेल
शेतकऱ्यांची सध्याची स्थिती
सध्या खरीप हंगाम संपत आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पैशाची निवड आहे त्यामुळे काहीजण कमी भावात सोयाबीन विकत पण सरकारने दिलेल्या हमीभावाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने थोडा संयम ठेवला तर चांगला दर मिळू शकतो नोंदणी त्यांनी पैसे मिळवण्याची प्रक्रिया तोडीत वेळ घेणारी असली तरी विश्वासह आणि सुरक्षित आहे त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन लगेच विकू नये
कोणत्या संस्थेमार्फत खरेदी होणार
सोयाबीन आणि भावाने खरेदी खालील संस्थेमार्फत केली जाणार आहे
- नाफेड (NAFED)
- सीसीआय (CCI)
- राज्य कृषी उत्पन्न मंडळ
या संस्थेकडून शेतकऱ्यांना सरकार ठरवलेल्या दरानेच खरेदीचा लाभ दिला जाईल
शेतकऱ्यांनी काय करावे
- आपल्या सोयाबीन विक्रीत घाई करू नका
- 30 ऑक्टोंबर पासून नोंदणी करा
- गरज पडते सोयाबीन विकून उर्वरित सोयाबीन हमी भाव केंद्रासाठी ठेवा
- नोंदणी करताना जमिनीचा 7/12 उतारा आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, आणि पिकांची माहिती असू द्या
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संदेश किंवा पावती जपून ठेवा
भावांतर योजनेची शक्यता
शासनाकडून भविष्यात भावांतर योजना (ज्या शेतकऱ्यांना बाजार भाव हमीभावापेक्षा कमी मिळतो त्यांना फरकाची रक्कम मिळते) सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दुहेरी फायदा मिळू शकतो
निष्कर्ष : सोयाबीन हमीभाव खरेदी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा करणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारातील अस्थिरता असते तिच्या पासून बचाव होईल आणि भावाने योग्य दर मिळेल
नोंदणी सुरू 30 ऑक्टोंबर 2025 नोंदणी करा – हमी भावाचा लाभ घ्या -योग्य दर मिळावा!





