बीज भांडवल योजना 2025 मराठी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई शहर उपनगर कार्यालयामार्फत सन 2025- 26 व्या वर्षी साठी अनुसूचित जाती आणि नौबौद्ध घटकातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत यामध्ये 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन (Maharashtra government subsidy schemes 2025) प्रमुख योजना असून इच्छुकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे
50 टक्के अनुदान योजना प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये पर्यंत अनुदान प्रकल्प कर्जाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध कर्जावरील व्याज बँकेच्या नियमानुसार परतफेड कालावधी सर्वसाधारणपणे तीन वर्ष बीज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा 50, 001 रुपये ते 5 लाख रुपये पर्यंत बीज भांडवल कर्ज प्रकल्प कर्जाच्या 20 टक्के रक्कम 4 टक्के व्याजदराने अनुदान प्रकल्प मर्यादा च्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये बँक कर्ज प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के पर्यंत परतफेड कालावधी तीन ते पाच वर्ष सामान हप्ता पद्धतीने स्वतःचा सहभाग प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के
बीज भांडवल योजना 2025 योजनेसाठी लागणारे कागदपत्रे (document)
अर्ज करतांना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- जातिजा दाखला (सूक्ष्म अधिकार्याने दिलेला)
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो पाच
- रेशन कार्ड / मतदान कार्ड / ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- बँक पासबुक व खाते क्रमांकाची झेरॉक्स
- प्रकल्पानुसार कोटेशन
- व्यावसायिकांसाठी जागेचा पुरावा (लागल्यास) प्रकल्प अहवाल व इतर आवश्यक दाखले (उदाहरण: वाहना साठी परवाना,परमिट,बेंच नंबर इ )
पात्रता (Eligibility Criteria for Mahatma phule 50 Percent Subsidy Scheme 2025)
- अर्जदार अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील असावा
- लाभार्थ्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
- वार्षिक उत्पन्न मर्यादित शहरी व ग्रामीण दोन्ही भागांसाठी तीन लाख रुपये पर्यंत
- अर्जदार कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा थकबाकीदार नसावा
How to apply for Mahatma phule 50 percent subsidy scheme अर्ज कुठे करायचा
अर्जदाराने अर्ज स्वतः उपस्थित राहून सादर करावा
कोणत्याही प्रकल्पाच्या मध्यस्थी मार्फत किंवा दुसऱ्या कोणाच्या मार्फत अर्ज स्वीकारला जाणार नाही
कार्यालयाचा पत्ता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या गृहनिर्माण भवन तळमजला रूम नं 35 कला नगर बाद्रा (पूर्व) मुंबई 51
महत्वाची सूचना अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणते योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्ज तीन प्रतीसह मूळ कागदपत्रे दाखवून सादर करावा अर्ज स्वीकारणे व वाटप कार्यालयाने वेळेवरच करण्यात येईल
टीप : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील तरुण-तरुणी व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार व उद्योग निर्माण करून घ्याव्यात





