ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply

शेतकऱ्यांना शेतीतील वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीची गरज असते राज्यसरकारकडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी अनुदान (subsidy) उपलब्ध करून देण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी Mahadbt Farmer Scheme portal वरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया ट्रॅक्टर ट्रॉली साठी अनुदान अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती आहेत

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना म्हणजे काय

महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारी ही योजना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत येते यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ला जोडली जाणारी ट्रॉली खरेदी करण्यासाठी अनुदानाचे सहाय्य दिले जाते ट्रॉली ची क्षमता 3 टन किंवा 5 टन पर्यंत असू शकते आणि त्यानुसार अनुदानाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते

अर्ज करण्यासाठी लागणारी अटी

  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी आणि शेतकरी असावा
  • अर्जदाराच्या नावावर ट्रॅक्टर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे
  • अर्ज काढण्यापूर्वी यंत्र खरेदी करू नये
  • सर्व कागदपत्रे ऑनलाइन स्वरूपात अपलोड करावी लागेल

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. शेत जमिनीचा 7/12 उतारा
  3. बँक पासबुक
  4. ट्रॅक्टरची नोंदणी प्रमाणपत्र ( RC Book )
  5. टेस्ट रिपोर्ट आणि विक्रेत्याचे प्रमाणपत्र

↗️ कृषी यांत्रिकीकरण यादी 2025 ट्रॅक्टर व कृषी अवजारावर शासनाचे अनुदान

↗️ नुकसान भरपाई अनुदान यादी KYC करा

↗️ अतिवृष्टी नुकसान भरपाई व पिक विमा अपडेट

↗️ नुकसान भरपाई केवायसी कशी करायची पहा

↗️ छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना

↗️ सुधारित पंचनामे पूर्ण आकडा वाढला

↗️ सोयाबीन शेतकरी तोट्यात

↗️ पिक विमा केवायसी लवकर करा

Mahadbt Farmer Scheme portal वर लॉगइन कसे करावे

सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा farmer scheme Login पर्यावर निवडा

तुमचा farmer ID आलेला OTP टाकून लॉग इन करा

लोगिन झाल्यानंतर डाव्या बाजूस असलेल्या घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा

अर्ज प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप

घटकासाठी अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत बाब निवडा पुढील टप्प्यात कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य निवडा नंतर ट्रॅक्टर पावर टेलर चलीत अवजारे हा पर्याय निवडा आपली HP श्रेणी (20 35 BHP) निवडा यंत्रसामग्री मध्ये ट्रॅक्टर ट्रॉली /ट्रेलर (3 टन किंवा 5) पर्याय निवडा मार्गदर्शक सूचना वाचून जतन करा वर क्लिक करा अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करा वर क्लिक करा

अर्ज सादर करताना तुम्हाला 23.60 इतके अल्प शुल्क ऑनलाइन भरावे लागेल पेमेंट झाल्यानंतर अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्याचे संदेश तुम्हाला दिसेल

अर्जाची प्रक्रिया

अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची छाननी संबंधित कृषी विभागाकडून केली जाते तुमचा अर्ज अपात्र ठरल्यास तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून ट्रॉली खरेदी प्रक्रिया सुरू करता येते अनुदानाची रक्कम मंजूर झाल्यानंतर ती तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते

अनुदान किती मिळते

  • 3 टन क्षमतेची ट्रॉली : 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान
  • 5 टन क्षमतेची ट्रॉली : 60 हजार पर्यंत अनुदान (श्रेणी व जिल्ह्यानुसार बदलू शकते)

महत्वाची सूचना अर्ज केल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अर्ज झाल्यानंतर त्याचा स्टेटस pending किंवा Submitted म्हणून दिसेल पुढे मंजुरी मिळाल्यावरच खरेदी प्रक्रिया करा

निष्कर्ष : ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना 2025 ही राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे ट्रॅक्टर साठी खरेदी करताना या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भार मोठा प्रमाणात कमी होतो यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आजच Mahadbt Farmer portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि शासनाच्या या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा

Leave a Comment