जय शिवराय मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट समोर आला आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari sanmaan Yojana) अंतर्गत पात्र असलेल्या परंतु आजवर कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या आता कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत
औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिले आहे की या योजनेअंतर्गत पात्र असूनही अजूनही कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सहा आठवड्याच्या आत पूर्ण करावी हा आदेश देण्यात न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांच्या खंडपीठा कडून देण्यात आला आहे हा निकाल भाऊसाहेब फारके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे या याचिकेत शासनाने न्यायालयाच्या आधार यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता याच्यामुळे आता कोर्टाने पुन्हा एकदा शासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ठरवलेल्या कालावधीत सर्व पात्र शेतकरी कर्जमाफी पूर्ण करावी
आधीचा इतिहास 44 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी
2017 साली सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती या योजने शेतकऱ्यांना कर्ज जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंत ची कर्जमाफी संपूर्ण मंजूर करण्यात आली होती मात्र विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे सुमारे 6.8 लाख शेतकरी कर्ज पासून वंचित राहिले या शेतकऱ्यांना डाटा अपूर्ण असल्याने कारण सांगून त्यांची कर्जमाफी थांबवण्यात आली होती
शासनाची भूमिका आणि निधी मंजूर
या विषयावर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः हस्तक्षेप करून या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सरकारने सुमारे सहा हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला होता तात्पर्य त्यानंतर अंमलबजावणीत उशीर होत गेला आणि शासनाने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी वेळेवर केली नाही परिणामी कोर्टाचा आदेश न केल्याबद्दल पुन्हा याचिका दाखल करण्यात आली
न्यायालयाचा ताजा आदेश 6 आठवड्यात कर्जमाफी पूर्ण करा
न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि वैशाली जाधव यांच्या खंडपीठाने या प्रकरणात पुन्हा सुनावणी घेत राज्य शासनाला सहा आठवड्यात कर्जमाफी करायचे स्पष्ट आदेश दिले आहेत या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे
कोणते शेतकरी होतील लाभार्थी
ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना CSMSSY अंतर्गत पात्र ठरलेल्या पण तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू होईल यामध्ये समाविष्ट असणारे शेतकरी ते आहेत ज्यांची कर्जाची रेकॉर्ड योग्य प्रकारे अपलोड के झाले नव्हते किंवा बँकेने माहिती अद्याप व केली नव्हती आता शासनाला या सर्व शेतकऱ्यांची माहिती पुन्हा हाताळून कर्जमाफी देण्याचे आदेश मिळाले आहेत
2022 मधील तांत्रिक अडचणी
शासनाने पूर्वी दिलेल्या माहितीनुसार कर्जदाराचा डाटा बँकेकडून रिकवर करण्यात येत होत्या काही प्रकरणांमध्ये ही माहिती डेटाबेस मधून नष्ट झाली होती त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया थांबवावी लागली आता न्यायालयाच्या आदेशानंतर शासनानेही माहिती पुन्हा मिळवून डिजिटल प्रणाली सुधारणा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे
शेतकऱ्यांसाठी त्यांचा नेमका अर्थ काय
6.58 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार शासनाला 5,800 ते 6 हजार कोटी रुपयांच्या निधीची निधीची गरज लागणार 6 आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल थकीत कर्जदार शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार आदेश अमलात असल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातून कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळेल आणि त्यांची नावे असलेल्या तर कर्ज रद्द होईल
जिरायती बागायती फळबागाची नुकसान शेतकऱ्यांना मिळणार मदत
गाळयुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना पात्र लाभार्थ्यांना मिळणार मदत
मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही राज्य सरकारची येथे अशी योजना आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पण काहीजण वंचित राहिले होते आता कोर्टाच्या आदेशानंतर या शेतकऱ्यांनाही प्रतीक्षा संपणार आहे राज्यशासनाने आदेशाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली तर पुढील काही आठवड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल हे निश्चितच आहे शेती करणाऱ्या सर्व कुटुंबासाठी आनंदाची बातमी आहे
शेवटी चे शब्द
शेतकरी बांधव ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आपण पात्र असाल तर आपल्या बँकेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा आणि आपल्या नावाची माहिती तपासा ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून कोणतेही पात्र शेतकरी वंचित राहू नये
🙏 जय शिवराय जय जवान जय किसान 🙏





