सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

जिल्ह्यामध्ये शेतकरी सोयाबीनचे काढणे करून विक्री करू लागले आहे मात्र नाफेड अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फाउंडेशनतर्फे हमी भाव केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या दरात सोयाबीन विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 900 रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी केंद्र लवकर सुरू करावी अशी मागणी होऊ लागली आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि भाव खरेदी केंद्रे कधी सुरू होण्याची प्रतीक्षा करू लागला आहे जिल्हा खरिपात सोयाबीन चा 32 हजार 251 हेक्टर वर पेरा झाला होता मुळात यंदा पाऊस लवकर झाल्याने सोयाबीन पेरणी व त्याचा परिणाम झाला असून सततच्या पावसाने काही प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन कमी होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता

शासनाने हमी भाव जाहीर केला आहे

  • सोयाबीनला 5 हजार 328
  • मुगा साठी 8 हजार 768
  • तुर 8 हजार
  • मका 2 हजार 400
  • मूग 8 हजार 768
  • उडीद 7 हजार 800 रुपये प्रति क्विंटल असा भाव जाहीर केला आहे

नाफेड अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फाउंडेशन तर्फे शिराळ आणि सांगली येथे आम्ही भाव केंद्र सुरू केले जाणार आहे मार्केटिंग फाऊंडेशनने दोन केंद्राचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर सादर केले आहे त्याबरोबर पणन मंडळाच्या माध्यमातून यंदापासून सोयाबीन उडीद, भात, तूर, मका या पिकांची हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे आणि जिल्ह्यात सांगली आटपाडी शिराळा पलूस आणि इस्लामपूर या बाजार समित्या खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत असे पणन मंडळाला सांगितले आहे शासनाने पणन मंडळाला याबाबत आदेश दिले नाहीत शासनाने आदेश दिल्यानंतर या बाजारात समित्या कडून खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत संबंधित विभागाकडे सादर केला जातील त्यानंतर ही प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जाणार असून त्यावर मंजुरी मी त्यानंतर खरेदी केंद्रे सुरू होणार आहे

सध्या हमी भावापेक्षा कमी दर

सांगली जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीला गती आली आहे खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी सोयाबीन विक्री करू लागली आहे सोयाबीन चा ओलावा 10 ते 12 % त्याला प्रति क्विंटल सरासरी 4 हजार 300 रुपये असा दर बाजारात मिळत त्यामुळे हमीभावापेक्षा सरासरी 900 रुपये दर कमी मिळत आहे त्यातच सोयाबीनचा ओलावा (आद्र्रता) वाढली तर प्रति क्विंटल असा दरात कापत करून ते पैसे शेतकऱ्यांना मिळतात सोयाबीन विक्रीचा हंगाम संपल्यावर खरेदी केंद्र सुरू करणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे

Leave a Comment