सुधारित पंचनामे पूर्ण; आकडा वाढला या सहा जिल्ह्यांना विशेष मदत जाहीर

पुणे राज्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे त्यात सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्र शासन निर्णयानुसार विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आहे या आपत्तीमुळे तब्बल 83 लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 7 हजार 98 कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे राज्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे नुकसान मोजण्यासाठी तब्बल 17 दिवसाचा कालावधी लागला आहे महसूल व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनामे नुसार 34 जिल्ह्यांपैकी वर्धा,यवतमाळ, अमरावती, धुळे, अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या यापूर्वीच पंचनामे पूर्ण करण्यात आले होते यामुळे हा जिल्ह्यामध्ये नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर वर करण्यात आले आहे त्यानुसार सुमारे 7 लाख 2 हजार 19 हेक्टरचे क्षेत्र वाढले आहे

  1. भाव कमी असताना विकत आहे सोयाबीन शेतकरी
  2. पिक विम्याचे अनुदान वाटप सुरू
  3. रोपटॉप सोलर योजनेत मोठ्या प्रमाणात अनुदान
  4. शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळण्याचा अंदाज
  5. मक्का नियोजन पंचसूत्री
  6. जिरायती बागायती शेतकऱ्यांना मदत
  7. या जिल्ह्यांकरता नुकसान भरपाई मंजूर

राज्यात गुरुवारी अखेर एक लाख 11 हजार 223 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते आता त्या सात लाख 2हजार 19 क्षेत्र अंतर्भूत करण्यात आल्यानंतर एकूण नुकसानीचे क्षेत्र 8 लाख 13 हजार 242 हेक्‍टर इतके झाले आहे या नुकसानीमुळे राज्यात 83 लाख 12 हजार 970 शेतकरी तडाखा बसला आहे या पंचनामे अनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे 7 हजार 98 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे आता राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग संदर्भात शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मदत थेट खात्यावर जमा करणार आहे

सुधारीत आकडेवारी एकूण बाधित क्षेत्र

  • एकूण बाधित क्षेत्र = 68,13,242
  • एकूण बाधित जिल्हे = 34
  • एकूण बाधित शेतकरी 83,12, 970
  • भरपाई 70,098 कोटी 68 लाख 21 हजार

राज्यांमधील 6 जिल्ह्यांसाठी विशेष बाबी

राज्य मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले त्यातील सहा जिल्ह्यांमध्ये मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वी पंचनामे झाले होते त्यामुळे या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून 2 हेक्टर ची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत केली आहे

Leave a Comment