आज आपण जाणून घेणार आहोत रोपटॉप सोलर अनुदान योजना 2025 बद्दल नेमकं सोलर पॅनल साठी किती अनुदान दिले जातात अर्ज कसा करायचा कोणत्या योजना चालू आहेत आणि कोणत्या पोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करायचं चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
रोपटॉप सोलर योजनेचा उद्देश
शासन मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक घर सौरऊर्जेने स्वयंपूर्ण बनवणे यामुळे वीज बिलाचा बोजा कमी होतो तसेच पर्यावरण पूर्वक ऊर्जा चा वापर वाढतो महाराष्ट्र राज्यात रोपटॉप सोलार योजनेसाठी अनेक उपयोजना राबवल्या जात आहेत मॉडेल सोलर इमेज योजना राज्यातील काही गावे पूर्णपणे सर्व ज्याच्या अंतर्गत आणण्यासाठी मॉडेल सोलर व्हिलेज योजना राबवली जाते योजनेअंतर्गत निवडलेल्या गावाला एक कोटी रुपयांचे अनुदान किंवा पारितोषिक दिले जाते
वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी अनुदान
जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवायचे असतील तर शासनाकडून एक किलो वॅट ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम साठी 78 हजार रुपये अनुदान दिले जाते
- 1 किलो वॅट ते 3 किलो वॅट क्षमतेपर्यंत : अनुदान 78 हजार रुपये
- 3 किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेसाठी अनुदान मर्यादित प्रमाणात मिळते
स्मार्ट सोलर योजना I-SMART Maharashtra राज्य शासनाने आणखीन एक विशेष योजना सुरू केली आहे स्मार्ट सोलार योजना (I-SMART) ही योजना प्रामुख्याने 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आणि दारिद्र्यरेषेखाली ग्राहकांसाठी आहे
✅फक्त 2 हजार 500 रुपये भरून सोलर योजनेचा लाभ घेता येतो
✅अनुदानाचे प्रमाण
- ओपन प्रवर्ग 80% पर्यंत
- ओबीसी प्रवर्ग 90 टक्के पर्यंत
- दारिद्र रेषेखालील कुटुंबे 95 टक्के पर्यंत
कोणत्या पोर्टल वर अर्ज करावा
सोलर योजनेकरिता दोन प्रमुख पोर्टल उपलब्ध आहे
- महाडिकॉम पोर्टल www.mahadiscom.in
- सेंट्रलाइज पोर्टल पीएम सूर्य घर मुक्त योजना (Www pmsuryaghar. gov. in)
हे पोर्टल एकमेकांशी जोडलेले आहेत (Integration केलेले आहे) त्यामुळे कोणतेही पोर्टल वरून अर्ज केल्यास तो वैद्य धरला जातो
तुमच्यासाठी काही नवीन आर्टिकल
- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार
- रब्बी मक्का नियोजन
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती बागायती फळपिकांना मदत
- भारतीय अन्नसुरक्षेचा गहू साठा घटला
- अतिवृष्टी नुकसान महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ( step by step)
- महाडिकॉम पोर्टल
मुख्य पानावर Rooftop Solar apply online किंवा Pm Surya Ghar Yojana असा पर्याय दिसतील त्यावर क्लिक करा
2. कंजूमर नंबर टाका तुमचा Consumer Number (बिलवरील टाका) आणि Search वर क्लिक करा तुमच्या नंबरवर जोडलेले मोबाईल वर ओटीपी OTP येतो नंतर तो नंतर एंटर करा आणि पुढे जा
3. ग्राहक माहिती तपासात : संपूर्ण माहिती नाव पत्ता बिलिंग युनिट स्वयंचलितपणे दिसेल जर आवश्यक असेल तर पर्याय लँडमार्क किंवा ईमेल आयडी अपडेट करा
4.आधार पाताळणी आपला आधार क्रमांक टाका Generate ओटीपी वर क्लिक करा आलेला ओटीपी भरून Aadhaar Verify करा त्यानंतर प्रणाली आपली आधार माहिती आपोआप घेईल
5. योजना निवड
योजनेच्या यादीतून PM Surya Ghar Muft Bijli Yojana किंवा I-SMART Solar scheme निवडा
6.किलोवॅट क्षमतेची निवड
तुमच्या घरच्या वापरानुसार क्षमतेची निवड करा (वन के डब्ल्यू टू के डब्ल्यू 3 के डब्ल्यू तसेच नेट मीटिंग प्रकार Residential Consumer
7.ओटीपी व्हेरिफिकेशन आणि सबमिशन
सर्व माहिती भरल्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा आणि अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन नंबर दिला जाईल
पुढील प्रक्रिया
अर्ज दिल्यानंतर तुम्हाला अर्जाचा क्रमांक मिळतो तपासणी अहवाल संबंधित विभाग तुमचा अर्ज तपासून अहवाल तयार करतो संस्थेची निवड अधिकृत यंत्रणा कामासाठी निवडली जाते करार प्रक्रिया निवडलेल्या संस्थेसोबत करार केला जातो प्रत्यक्ष काम सुरू करारानंतर सोलर यंत्रणा बसवण्याचे किंवा काम सुरू करण्याचे नियोजन केले जाते
या सर्व प्रक्रियेत पूर्ण झाल्याने तुमच्याशी योजना पूर्ण मानली जाते आणि लाभार्थ्याची रक्कम मंजूर होते
वेडर निवड कशी करावी
महाडिस्कॉम आणि नॅशनल पोर्टल दोन्हीवर वेडर ची यादी उपलब्ध आहे आपल्या जिल्ह्यातील उपलब्ध एजन्सी त्यानुसार वेडर निवडल्यानंतर ओटीपी पातळी करून वेंडर सिलेक्शन सबमिट करायचे त्यानंतर संबंधित एजन्सी तुमच्याशी संपर्क साधेल आणि इन्स्टॉलेशन ची प्रक्रिया सुरू होईल
अनुदान किती मिळेल
| ग्राहक प्रकार | वापर | अनुदान टक्केवारी | अंदाजे रक्कम |
| गरीब व अल्प उत्पन्न गट | 100 युनिट पेक्षा कमी | 90-95% | 60, 000 ते 78 हजार पर्यंत |
| ओपन /ओबीसी प्रवर्ग | 100 युनिट पेक्षा जास्त | 80% | 50,000 पर्यंत |
| सर्वसाधारण ग्राहक | 3 किलो वॅट पर्यंत | 78 हजार पर्यंत | ———- |
अर्ज करतांना लागणारी कागदपत्रे
- विज बिल (Consumer Number) सहित
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ईमेल आयडी किंवा फोन नंबर
- पासबुकची प्रत (अनुदान जमा करण्यासाठी)
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज केल्यानंतर सर्व माहिती बरोबर भरणे अत्यंत गरजेचे आहे
- चुकीचा कंजूमर नंबर दिल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो
- फॅसिलिटी रिपोर्ट व वेंडर सिलेक्शन पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉलेशन सुरू होते
- 100 युनिट कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक लाभ मिळतो
निष्कर्ष : रोपटॉप सोलर अनुदान योजना ही घरबसल्या मोफत वीज मिळवण्याची सुवर्णसंधी आहे स्मार्ट सोलर आणि पीएम सूर्य घर दोन्ही योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना लाखो रुपयांचे अनुदान मिळत आहे
मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला नसेल तर हा आजच महाडिस्कॉम किंवा पीएम सूर्य पोर्टल वरून अर्ज करा आणि स्वरऊर्जेकडे एक पाऊल टाका
☀️ शाश्वत वीज- शाश्वत भविष्य🌞





