दिवाळीपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात जुलै ते सप्टेंबर 2025 या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सलग आणि अनियमित पावसामुळे पिके उध्वस्त झाली शेतातील माती वाहून गेली आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला विशेष सोयाबीन कापूस आणि मूग यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डळमळली होती राज्य शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले नुकसानीची भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात आले आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली शासनाने दिलेल्या आश्वासन ना नुसार दिवाळीपूर्वीच ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली आहे
2 लाख 75 हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची भरपाई जमा करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या या नुकसानी निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे पिकांच्या नुकसान नंतर जेव्हा शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मदत निधी मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे असू फुलवले आहे
शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त
शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी सांगितले की माझ्याकडे तीन एकर शेती आहे आणि त्यात सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या सलत पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले वेळेत मदत दिली माझ्या हातात 11,475 रुपये जमा झाले आहे दिवाळीपूर्वी ही मदत म्हणजे आमच्यासाठी दिलासा ठरले आहे दुसऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे माझीशेती काही ठिकाणी वाहून गेली पिकांसह जमीन सुद्धा खराब झाली सरकारने पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं वचन पाळत माझ्या खात्यात 11 हजार 500 जमा झाले ही मदत वेळेत मिळाल्याने दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक हातभार लागला आहे
तुमच्यासाठी काय खास लेख खालील दिलेले आहे
↗️ नुकसानीचा तीन हेक्टर मर्यादीचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा
↗️ होम पेजवर काही तुमच्यासाठी खास योजना
↗️ दिव्यांगासाठी खास प्रमाणपत्रासाठी सोपी पद्धत
↗️ कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी जाहीर
↗️ दिव्यांगाला मिळाले 755 इ रिक्षाचे वाटप
↗️ ट्रॅक्टर ट्रेलर साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
शासनाचा संवेदनशील निर्णय
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (बुलढाणा शेतकरी मदत 2025 ) बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता काही भागात पिकांची पूर्णपणे आणि हानी झाली अशा वेळी शासनाने तात्पुरते का ते तातडीने नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करून मदतीची रक्कम वितरित केली विशेष म्हणजे या वेळेस शासनाने थेट लाभ हस्तांतरण DBT पद्धतीने रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली त्यामुळे मदत प्रत्येक लाभार्थी पोहोचणे शासनाने दिलेली ही वेळेची आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी चा दिलासा ठरले आहे अनेक शेतकरी या पद्धतीमुळे त्यांना घरखर्च बियाणे खरेदी आणि पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी ही मदत आधार आहे
शेतकऱ्यांचा शासनावर वाढलेला विश्वास
राज्यशासनाने अतिवृष्टी तील नुकसानीची दखल घेत तातडीने मदत वितरित केल्याने शेतकऱ्यांचा शासना वरील विश्वास अधिक दृढ झाला आहे काही दिवसांपूर्वी पर्यंत अडचणीत असलेल्या शेतकरी आता दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत शेतकऱ्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे त्यांना सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे
निष्कर्ष : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळालेली नुकसान भरपाई ही केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या परिश्रमांना मिळालेली एक छोटीशी दाद आहे पावसामुळे झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघाला असला तरी शासनाने दिलासा हा शेतकऱ्यांसाठीचा आनंद ठरला आहे शासनाची हित आणि संवेदनशीलता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी एक सकारात्मक व उदाहरण आहे तसेच लवकरच सरकार पुढील विचार करून इतर राहिलेल्या जिल्ह्याचा मदत करावी हीच आशा आहे





