राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टर क्षेत्र पर्यंत मिळणार मदत

पूरग्रस्तांसाठी मदत ही 2 हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनी साठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जारी केला होता त्यानुसार वाढीव एक हेक्टर च्या पोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आली आहेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आहे आतापर्यंत 8 हजार 139 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे राज्यातील सहा लाख 46 हजार 310. 83 हेक्‍टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी 6 लाख 12 हजार 166 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे यापूर्वी या शेतकऱ्यांना 2 हेक्‍टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती तर आता अतिरिक्त 1 हेक्‍टरसाठी वाढीव मदत देण्याचा येणार आहे

अशा पद्धतीने मिळणार मदत

  • छत्रपती संभाजी नगर विभागातील : परभणी, लातूर, बीड छत्रपतीसंभाजी नगर,जालना, हिंगोली,नांदेड या जिल्ह्यातील 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांना 3 लाख 88 हजार 101. 13 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपये
  • नागपूर विभागातील : नागपूर,वर्धा,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3 हजार 931 शेतकऱ्यांच्या 7 हजार 698. 25 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 7 कोटी 51 लाख 75 हजार रुपये
  • नाशिक विभागातील : जळगाव,नाशिक आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील 53 हजार 835 शेतकऱ्यांच्या 50 हजार 629 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 59 कोटी 36 लाख 13 हजार रुपये
  • अमरावती विभागातील : अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख 7 हजार 615 शेतकऱ्यांना एक लाख 39 हजार 438.23 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 131 कोटी 56 लाख 47 हजार रुपये
  • पुणे विभागातील : सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 88 हजार 143 शेतकऱ्यांना 70 हजार 18.89 पिकांच्या नुकसानीपोटी 103 कोटी 37 लाख 20 हजार रुपये
  • कोकण विभागातील : पालघर व ठाणे जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या 25.33 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख 16 हजार रुपये

दिव्यांगांसाठी सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र काढा

लाडक्या बहिणीला2100 चा हप्ता मिळेल का

कृषी यांत्रिकीकरण मध्ये यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी

Leave a Comment