Shetkari Nuksan Bharpai List 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरणार आहे राज्य शासनाने अखेर छत्रपती संभाजी नगर जालना आणि वर्धा या तीन जिल्ह्यांच्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरणासाठी मंजुरी दिली आहे गेल्या काही महिन्यांपासून शेतकरीवर्ग शासनाच्या मदतीची वाट पाहात होता इतर जिल्ह्यांच्या प्रस्तावांना आधीच मंजुरी मिळाली होती परंतु या तीन जिल्ह्यांचा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे प्रलंबित होता या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती अखेर 29 ऑक्टोंबर 2025 रोजी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी देऊन लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे
मंजुरी जिल्हे आणि लाभार्थी संख्या
या निर्णयानुसार छत्रपती संभाजी नग, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण 12 लाख 62 हजार 799 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे राज्य शासनाने एकूण 913 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे
जिल्हा निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे :
- छत्रपती संभाजी नगर जिल्हा : सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे बाधित 6,44, 649 शेतकऱ्यांना 480 कोटी 17 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित होणार आहे
- जालना जिल्हा : 15,45,890 शेतकऱ्यांना 356 कोटी 66 लाख 26 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे
- वर्धा जिल्हा : 72,260 शेत 76 कोटी 57 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे
नुकसान भरपाईचे निकष
राज्य शासनाच्या नियमानुसार ही नुकसानभरपाई 2 हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी लागू राहणार आहे याशिवाय शासनाने एक हेक्टर पर्यंत वेगळी मदत देण्याची ही निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रति हेक्टर 10 हजाराची अतिरिक्त स्वतंत्र जीआर द्वारे मंजूर करण्यात येणार आहे याचा अर्थ असा की लहान शेतकऱ्यांनाही समप्रमाणात दिलासा मिळेल आणि प्रलंबित नुकसानभरपाईचे वितरण पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल
वितरण प्रक्रिया कशी होणार
नुकसानभरपाईचे वितरण दोन टप्प्यात केले जाणार आहे
पहिला टप्पा ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॉक फार्मर आयडी farmer ID आहे त्यां शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा केली जाईल
दुसरा टप्पा : ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांना KYC आधारित हाताळणी पूर्ण केल्यानंतर मदत दिली जाईल
या दोन्ही टप्प्यामध्ये जिल्हानिहाय नुकसानभरपाईचे वितरण पारदर्शक पणे पारपडेल असे कृषी विभागाने जाहीर केले आहे
↗️ महाडीबीटी योजना 34 लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
↗️ soybean MSP
↗️ Rabbi 2025 हेक्टरी मदत जाहीर
↗️ फळबाग लागवड योजनेत 100% अनुदानावर खत
शेतकऱ्यांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय
हा जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे काही दिवसांपूर्वी या दोन्ही जिल्ह्याचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याने असंतोष होता मात्र राज्य शासनाच्या तत्परतेमुळे अखेर सर्वच शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणीत ठेवले जाणार नाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना पर्यंत शासनाची मदत पोहोचवली जाईल
अधिकृत माहिती कुठे पाहावी
शेतकरी मित्रांनो या निर्णयाचा अधिकृत जीआर आणि लाभार्थी यादी आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता तसेच स्थानिक कृषी कार्यालयातही यासंदर्भात तपशील उपलब्ध करण्यात आला आहे
निष्कर्ष : एकूण छत्रपती संभाजी नगर जालना आणि वर्धा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरला आहे दीर्घ प्रतीक्षा अखेर नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाल्याने आता शेतकरी वर्गाला आर्थिक मदत मिळणार आहे राज्य शासनाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या विश्वास मला बळ देणारा आणि महत्त्वाच्या कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक दिशादर्शक ठरवतो आहे





