राज्यामधील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे ज्या विहिरी मध्ये गाळ जमा झाला आहे त्यासाठी 30,000 तसेच वाहून गेलेले प्रत्येक जनावरासाठी 37 हजार रुपये दिले जाणार आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली व वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहेत ज्या विहिरी मध्ये गाळ जमा झाला त्यासाठी 30000 तसेच वाहून गेलेले प्रत्येक जनावरांकरिता 37 हजार रुपये दिले जाणार आहे
कोणत्या नुकसानीसाठी किती दिले जातील ते सविस्तर जाणून घ्या कोणत्या नुकसानीसाठी किती पैसे मिळणार कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये दिले जाणार आहे हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपये दिले जाणार आहे बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 32 हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे गाळात असलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये दिले जाणार आहे पावसामुळे घर पडलेले असले तर पीएम आवास योजनेअंतर्गत नवीन घर दिली जाणार आहे डोंगरी भागातील घरांना दहा हजाराची अधिकची मदत दिली जाणार आहे ज्याच्या घरात नुकसान झालं आहे त्यांना घरबांधणीसाठी मदत दिली जाणार आहे गोटा दुकान या यांना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे वाहून गेलेले किंवा मृत्युमुखी पडलेले जनावरांसाठी प्रति जनावरावर 37 हजार रुपये दिले जाणार आहे खरडून गेलेल्या जमिनीकरिता हेक्टरी तीन लाख पन्नास हजाराची मदत 47 हजार रुपये रोख मिळणार आहेत बाकी रक्कम मनरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे
पिकांसाठी विमान नव्या स्वरूपात
सरकारकडून दिवाळी भेट शेतकऱ्यांसाठी
कीडग्रस्त पिकांवर शेतकऱ्यांना दिलासा
कुकुट पालना चे नुकसान झाले असल्यास शंभर रुपये प्रति कोंबडी मदत दिली जाणार आहे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत दिली जाणार याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे ज्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल शेतकऱ्यांना खचून जाऊ नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पंजाब तामिळनाडू तसेच कर्नाटक पेक्षा जास्त निधी आपण दिला आहे पिक विम्याचे ही मदत दिली जाणार आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही सर्व निकष आणि अटी शर्ती बाजूला ठेवून मदत केली जाणार आहे





