महाराष्ट्र तील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जची रक्कम जमा होणार आहे राज्य शासनाने या प्रलंबित कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून देत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे
2017 कर्जमाफी योजना पार्श्वभूमी
2017 राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती त्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 अतिरिक्त साहाय्य देण्यात येणार होते अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली तरी हजारो शेतकरी काही कारणास्तव या लाभापासून वंचित राहिले होते पुढे 2019 मध्ये नवीन कर्ज माफी योजना जाहीर झाली आणि 2017 मधील प्रलंबित शेतकरी पुन्हा एकदा बाकी राहिले त्यामुळे राज्यातील सुमारे 6.5 लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले
उच्च न्यायालयात याचिका शेतकऱ्यांना न्याय
या अन्यायाविरोधात अनेक शेतकऱ्यांनी नागपूर व छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केल्या कोर्टाने शासनाला स्पष्ट आदेश देत पात्र शेतकर्यांना तात्काळ लाभ देण्याचे निर्देश दिले तरी दिलेल्या मुदतीत कर्जमाफी न झाल्याने कोर्ट अवमान याचिका दाखल झाली आणि त्यानंतर पुन्हा सहा आठवड्यात कर्जमाफी करण्याचा आदेश देण्यात आला
शासनाचा निर्णय निधी मंजूर
शासनाने अखेर या आदेशाचे दखल घेत एक कोटी 25 लाख निधी तात्काळ उपलब्ध करुन हा निधी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे ऑफलाइन पद्धतीने थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल
तुमच्यासाठी खास आर्टिकल
नमो सन्मान निधी योजना नवीन नोंदणी
Rabi Maize farming Guide शेतकऱ्यांसाठी मका उत्पादन वाढवणाऱ्या पाच खास पद्धती
Bhausaheb fundkar Yojana Apply Online
कर्जमाफी कोणाला मिळणार
- 2017 कर्जमाफी योजनेत पात्र पण लाभ न मिळालेल्या शेतकरी
- ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे
- नागपूर व संभाजीनगर खंडपीठातील याचिका शेतकरी
यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्याचे शेतकरी आहेत
- यवतमाळ
- जळगाव
- अकोला
- अहमदनगर (अहिल्यानगर)
इतर शेतकर्यांची काय
प्रश्न असा की जे शेतकऱ्यारी याचिका टाकू शकले नाहीत त्यांना काय
सध्या मंजूर झालेला निधी फक्त याचीकेकर्त्यासाठी आहे त्यामुळे इतर eligible शेतकऱ्यांचे भविष्य अजूनही अनुसूचित आहे
मात्र हा निर्णय पुढील काळात उर्वरित 6.5 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा करेल अशी अपेक्षा आहे
महत्त्वाचा मुद्दा
ज्यांना 2017 मध्ये पात्रता होती पण लाभ मिळालेला नाही त्यांनी आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून माहिती पातळाला पुढील टप्प्यात मध्ये सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे
निष्कर्ष : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कोर्टाच्या आदेशानुसार शासनाने पाऊल उचलत निधी उपलब्ध केला आहे उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना आता पुढील लढा सुरू राहिल
शेतकरी बांधवांना पुढील अपडेट साठी आमच्या ब्लॉग वर लक्ष ठेवा धन्यवाद





