11th Class Online Admission 2026;राज्यात यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. विद्याव्यांचे अर्ज अचूक आणि त्वरित भरण्यासाठी विद्यालयांत मार्गदर्शन केंद्राची स्थापना होणार आहे.
याद्वारे शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी साहाय्य करावे तसेच
विद्यार्थ्यांनाही कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक भरावा लागणार आहे. निकाल लागण्याआधी भाग- १ भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गतवर्षी ३७ हजार प्रवेश, तरीही ४ हजार जागा रिक्तच
अकरावी प्रवेशासाठी गतवर्षी बौद्र जिल्ह्यात ५२ हजार आगा सर्व शाखांच्या उपलब्ध होत्या. ४१ हजार ८८४ नौदणीपैकी ३७ हजार ५५१ प्रवेश झाले. १६ फेन्या होऊनही ५ हजारांवर जागा रिक्तव राहिल्या.
शाळांत मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाइन
प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येक शाळेत व उच्च माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली आहे. शासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्येही मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना आहेत.
जिल्ह्यात ३०५ महाविद्यालये, ५२ हजार जागा
जिल्ह्यात ३०५ महाविद्यालये असून अकरावी प्रवेशासाठी यंदाही ५२ हजार आगांची क्षमता आहे.
कॅप व कोटा पद्धतीचा वापर
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दोन पद्धती आहेत. केंद्रीय प्रवेश फेन्याद्वारे म्हणजेच कैंप कोट्यातून अलॉटमेंट मिळवून किंवा कोटा अंतर्गत जागांवर संबंधित विद्यालयाशी संपर्क साधून प्रवेश घेता येणार आहे.
विलंबामुळे गतवर्षी डिसेंबरपर्यंत अंतिम फेरी
गतवर्षी जूनपासून सुरू झालेली ही प्रवेश प्रक्रिया १७ डिसेंबर २०२५ पर्यंत चालली, शैक्षणिक वर्ष आध्र्यावर झालेले असतानाही प्रवेश प्रलंबित राहिले.
अशी असेल प्रवेश प्रक्रिया
विद्यार्थाने प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग एक ऑनलाइन भरणे. पुढील टप्पा सुरू झाल्यानंतर पसंती क्रमांक भरणे, प्रवेशासाठी विविध फेन्यांतून मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे, असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप अमणार आहे.
प्रवेशासाठी ही कागदपत्रे ठेवा तयार
विद्याख्यांना इयत्ता दहावीची गुणपत्रिका तमेव शा सोडल्याचा शेवटचा दाखला तर आरक्षणाचा लाभ घेऊ इविकणाऱ्या उमेदवारांना इयत्ता दहावीची गुणपत्रिका, शाळेचा शेवटचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आणि लागू असणान्या संबंधित सामाजिक क्रिया वैधानिक आरक्षणाबाबत प्रमाणडा लागणार आहे.
यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनच
गतवर्षीप्रमाणे २०२६-२७ मध्ये राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता अकराचीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे
विद्यार्थ्यांनी भाग -१ भरून घ्यावा
इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी भाग – १ ची माहिती ऑनलाइन भरून घ्यावा, अडचण असल्यास जवळच्या उच्च माध्यमिक विद्यालयात संपर्क करावा. तसेच प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे काढून घ्यावीत. प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीबाबत सूचनांचे पालन करण्याबाबत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले आहे.






