महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत वर्ष 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर महिलांना विविध कृषी योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे याच अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प POCRA टप्पा 2 अंतर्गत महिला बचत गटांना गावात स्तरीय कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिला गटांना प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के इतके अनुदान दिले जाणार असून
अनुदानाची कमाल मर्यादा 24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतीसाठी आव्हानात्मक परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढवणे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या वर उपाय योजना करणे यावर विशेष भर दिला जात आहे
mahila bachat gat yojana या प्रकल्पांतर्गत राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमधील 7 हजार 200 पेक्षा अधिक गावांमध्ये विविध कृषी विकास कार्यक्रम राबवले जात आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 559 गावांचा समावेश करण्यात आला आजच्या आधुनिक शेतीमध्ये यंत्रसामग्रीचा वापर अत्यंत महत्त्वाचा झाला आहे वेळेवर आणि अचूक शेती काम यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रे आवश्यक असतात मात्र सर्व शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसते विशेष लहान व माध्यम शेतकऱ्यांना यंत्रसामग्री अभावी मुळे शेतीकामात अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या दूर करण्याकरिता गावपातळीवर कृषी अवजारे बँक ही संकल्पना राबवण्यात येत आहे
mahila bachat gat yojana या संकल्पनेनुसार गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध कृषी यंत्रसामग्री खरेदी करून ती शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री योग्य वेळतेआणि शेती काम अधिक जलद व्हावे व कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करता येते यामुळे शेतकऱ्यांचा श्रम व खर्च दोन्ही कमी होतो तसेच उत्पादनातही वाढ होते याच बरोबर महिला बचत गटांना एक चांगले उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते या योजनेअंतर्गत एक गाव एक कृषी अवजारे बँक या तत्त्वावर कृषी अवजारे बँक स्थापन केली जाणार आहे
परत प्रकल्प गावांमध्ये नोंदणीकृत महिला बचत गटांना यासाठी अर्ज करता येणार आहे उमेद MSRLM आणि MAVIM MAVIM प्रकृतिक महिला बचत गट तसेच महिला गाव संघ योजनेसाठी पात्र राहील अर्जदार बचत गटांमध्ये किमान 10 महिला सदस्य असणे आवश्यक आहे आणि या सर्व महिला वेगवेगळ्या कुटुंबातील असाव्यात mahila bachat gat loan interest rate या योजनेत कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 60 टक्के इतकी अनुदान दिले जाईल मात्र या अनुदानाची कमाल मर्यादा 24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे उदाहरणार्थ एखाद्या बचत गटाने 10 लाख रुपयांची कृषी अवजारे बँक स्थापन केली तर त्यांना 6 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते
त्याचप्रमाणे 20 लाख रुपयांचा प्रकल्प असल्यास 12 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते जर एखाद्या गटाने 50 लाख रुपयांची अवजारे बँक स्थापन केली तर त्यांना जास्तीत जास्त 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे कृषी अवजारे बँकेत ट्रॅक्टर सह विविध प्रकारची शेती यंत्रे, पेरणी यंत्र, फवारणी यंत्रे, नांगर, रोटावेटर, कापणी यंत्र अशा अनेक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात येतो या यंत्रसामग्रीच्या मदतीने एक कारण शेतीची कामे वेळेत पूर्ण करता येते विशेष पेरणी नांगरणी फवारणी आणि कापणी या सारख्या कामाच्या टप्प्यावर यंत्र सामग्री उपलब्ध असल्यास शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते
हा अर्ज करण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार असेल यासाठी शासनाने विविध विशेष पोर्टल उपलब्ध करून दिले आहे इच्छुक गटानी https://dbtndksp.mahapocra.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज सादर करावा अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे पात्र महिला बचत गटांनी या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे
जर एखाद्या गावातून एका पेक्षा जास्त महिला बचत गटांनी अर्ज केले असतील तर अशा परिस्थितीत लाभार्थ्याची निवड जिल्हा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे त्यामुळे सर्व अर्जदार गटाला सामान संधी मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील निश्चित करण्यात आल्या आहेत ज्या महिला बचत गटांना यापूर्वी कोणतेही शासकीय योजनेतून कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अनुदान मिळाले आहे अशा गटांना या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही त्यामुळे नवीन आणि पात्र महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे
mahila bachat gat yojana या योजनेमुळे महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे कृषी अवजारे चालवून महिला गट व उत्पन्न मिळू शकतात त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांना ही शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री सहज उपलब्ध होईल त्यामुळे शेती अधिक आधुनिक कार्यक्षम आणि नफ्याची होण्यास मदत होईल एकूणच पाहता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येणारी हि योजना ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतीच्या आधुनिक करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे महिला बचत गटाने या संधीचा लाभ घेऊन गावपातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन केल्यास गावातील शेती विकासाला चालना आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल
अधिक माहितीसाठी इच्छुक महिला बचत गटाने जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा संबंधित तालुका समन्वयक व प्रवर्तकाशी चर्चा करून आवश्यक कागदपत्रांची माहिती घ्यावी शासनाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन महिला बचत गटांनीशेती विकासात महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे





