Maharashtra Heavy rain alert :राज्यात मंगळवारपासून विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भातील वर्धा आणि अकोला येथे सलग दुसर्या दिवशी 45 अंश सेल्सिअस तापमान तर कोल्हापुरात 37.2 अंश तापमान होते.
राज्यात मंगळवारपासून पुन्हा विजांच्या कडकडाटांसह पाऊस अन् गारपिटीचा अंदाज आहे. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकणला फक्त मंगळवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचे यलो अलर्ट (कंसात तारीख) : पुणे, सांगली, सोलापूर (21 ते 24), कोल्हापूर, लातूर, धाराशिव, सातारा, छ. संभाजीनगर, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर (21 व 22), जालना, रायगड, रत्नागिरी (21).
सोमवारचे कमाल तापमान
अकोला, वर्धा 45, पुणे 40.7, जळगाव 41.6, कोल्हापूर 37.2, महाबळेश्वर 32.8, मालेगाव 40.9, नाशिक 39.4, सांगली 40.6, सातारा 40.9, सोलापूर 42.9, धाराशिव 40, छत्रपती संभाजीनगर 41.2, परभणी 41.3, अमरावती 44.2, बुलडाणा 41.2, चंद्रपूर 42.4, गोंदिया 43.5, नागपूर 44.4, वाशिम 43.6, यवतमाळ 43.2.






