New Unique Format For Revenue Certificates: महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले व सेवा यांकरीता लागणारे अर्ज नमुने व प्रतिज्ञापत्र यांचे ई डिस्ट्रीक्ट प्रकल्पाअंतर्गत प्रमाणिकरण करण्यात आलेले असून याबाबत संदर्भाधिन क्र. १ ते ४ येथील शासन निर्णय / परिपत्रक / शुध्दिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत.
तथापि, सदर विविध प्रकारचे दाखले व सेवा ह्या क्षेत्रीय कार्यालयाकडून निर्गमित करताना अधिक प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता नागरिकांना करावी लागत होती.
तसेच मंजूरीसाठी लागणारा कालावधी व मंजूरीचे स्तर कमी करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजना व सेवांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण Governance Process Re-engineering (GPR) अंतर्गत सेवांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आल्याबाबत, यासाठी लागणाऱ्या घटकांची संख्या कमी करण्यात आली असून नागरीकांसाठी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले असल्याचे संदर्भ क्र.५ येथील पत्रान्वये कळविण्यात आले आहे,
शासनाच्या विविध योजना व सेवांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण Governance Process Re-engineering (GPR) अंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या सेवांसाठी आवश्यक असलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रे, मंजूरीचे स्तर व अंतिम सेवेच्या मान्यतेचे दाखले / प्रमाणपत्र / शपथपत्र यात करावयाचे अनुषंगिक बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय:
शासनाच्या विविध योजना व सेवांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण Governance Process Re-engineering (GPR) अंतर्गत करण्यात येत असून शासनाने अधिसूचित केलेल्या सेवांसाठी लागणाऱ्या घटकांची संख्या कमी करण्यात आली तसेच नागरीकांसाठी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले आहे.
त्यासाठी आवश्यक असलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रे, मंजूरीचे स्तर व अंतिम सेवेच्या मान्यतेचे दाखले / प्रमाणपत्र यात करावयाचे अनुषंगिक बदल करण्याच्या अनुषंगाने शासनाने अधिसूचित केलेल्या खालील सेवांसाठी आवश्यक असलेल्या अर्जातील बदल “आपले सरकार” पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक सेवेच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, मंजूरीचे स्तर व निर्गमित करावयाची प्रमाणपत्रे संदर्भ क्र.५ अन्वये निर्धारित करुन देण्यात आलेली आहेत.
२. महसूल विभागांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या GPR टप्पा-१ अंतर्गत खालील सेवांचे Governance Process Re-Engineering (GPR) करण्यात येत असून त्या सेवा पुढीलप्रमाणे आहेत.
(१) शपथपत्राचा नमूना (General Affidavit)
(२) वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile Certificate)
(३) रहिवास प्रमाणपत्र (Residence Certificate)
(४) उत्पन्न प्रमाणपत्र (१ वर्षासाठी/३ वर्षासाठी) (Income Certificate)
(५) भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र (Bhoomiheen Certificate)
(६) अल्प भूधारक प्रमाणपत्र (Alpabhudharak Certificate)
३. आता, वरील दाखले राज्यातील सर्व जिल्ह्यांत सुधारीत नमुन्यात (Unique Format) देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने वरील सेवा/ दाखले यासाठी करावे लागणारे अर्ज, प्रतिज्ञापत्र, निर्गमित करावयाचे दाखले व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे “आपले सरकार” पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या संदर्भात “आपले सरकार” पोर्टलवर उपलब्ध सुचनेनुसार गलीच कार्यजाती कतमान मानी






