राज्यात 100% पीक विमा पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून राज्यभरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश दिले आहेत पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात देण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात आलेल्या ई- पाहणी मध्ये 36 % पिकांची नोंद करण्यात आली आहे नोंदणी न झाल्यास नैसर्गिक आपत्ती, पिक विमा, पीक कर्ज या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी ई- पीक पाहणी महत्वाचे आहे या पार्श्वभूमीवर शंभर टक्के पीक पाहणी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे
अशाप्रकारे ई पीक पाहणी नोंदणी
एपद्वारे लॉगिन केल्यावर शेतकर्यांनी आपल्या नावावर असलेल्या जमिनीचा गट क्रमांक निवडावा त्यानंतर पिकाची माहिती तसेच की पिक क्षेत्र पेरणी चे तारीख आधी काळजीपूर्वक भरावी त्यानंतर ॲप मध्ये आता 50 मीटरच्या आतून पिकांचा फोटो बंधनकारक असेल जेणेकरून पिकांची अचूक माहिती मिळेल एकदा माहिती जतन सेव केल्यावर ती आपोआप सातबार्यावर नोंदवली जाते त्यानंतर शेतीतील पिकांची नोंदणी अधिकृतपणे होतेच यामुळे पीक पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे





