वेतन व भत्ते, वैद्यकीय बिल, थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित.State Employees Salary Allowance Medical Bill Arrear Update

State Employees Salary Allowance Medical Bill Arrear Update:शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डससंदर्भ- मा. आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयात दि.०८/०४/२०२६ रोजी झालेली चर्चा

शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बील माहे १५. फेब्रुवारी २०२६ पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही.

ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डि.डि.ओ-२/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक/सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध/अवेधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल.

तसेच डिडिओ२ स्तरावरील लॉगीन मधून डिजिटल सर्विस रेकॉर्डस या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास डिडिओ २ यांना त्या देयकांचे MTR 44 A जनरेट करता येणार नाहीत अशा सुचना संचालनालयाचे पत्र क्र १६८५२९६ दि.२२/०१/२०२६ अन्वये देण्यात आल्या होत्या.

दि.०८/०४/२०२६ च्या मा मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या समवेत झालेल्या बेठकीतील निर्देशा प्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.

ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आयडी मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे डी.डी.ओ-१ स्तरावर काम अद्याप पूर्ण झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत.

प्रातः

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जि. प सर्व

३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/ दक्षिण पश्चिम) मुंबई.

४) प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका / नगर परिषद, सर्व.

५) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक/प्राथमिक) सर्व.

उपरोक्त आपणास याव्दारे सूचित करण्यात येत आहे की अधीक्षक यांनी त्यांच्या स्तरावरील सर्व प्रलंबित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणी माहे एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करावी.

शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक / विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरील तपासणी कामकाज माहे मे. २०२६ पूर्वी पूर्ण करावे.

Leave a Comment