महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी अनुदानाच्या योजना उपलब्ध आहेत पंपसंच, शेततळे अस्तरीकरण भाजीपाला, रोपवाटिका सिंचन सुविधा अशा अनेक घटकांचे आर्थिक मदत दिली जाते मात्र प्रत्येक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे वेगवेगळी असतात शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे या आर्टिकल मध्ये आपण महाडीबीटी शेतकरी योजना 2025-26 अंतर्गत पंपसंच यांचे वैयक्तिक शेततळे, भाजीपाला रोपवाटिका आणि इतर घटकांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी आणि सोप्या भाषेत जाणून घेऊया
महाडीबीटी शेतकरी कागदपत्राची पूर्ण यादी
खालील योजना शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत प्रत्येक योजनेनुसार आवश्यक कागदपत्राची नवीन यादी दिली आहे (Pump Set – ISI / BEE 4 Star Rated)
पंपसंच (Pump Set – ISI / BEE 4 Star Rated)
महाडीबीटी पोर्टलला पंपासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जातात सिंचन सुधारण्यासाठी हा घटक शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते
- आवश्यक कागदपत्रे तलाठी सही किंवा डिजीटल स्वाक्षरी असलेला नवीन सातबारा उतारा
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला 8 अ उतारा
- मंजूर घटकाचा टॅक्स रिपोर्ट (पंपसाठी आवश्यक)
- सामाईक जमीन असल्यास इतर खातेदाराची संमती पत्र
- 7/12 वर सिंचनाची नोंद नसल्यास विहीर शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणापत्र
- जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
शेतकऱ्यांसाठी ही कागदपत्रे अपूर्ण असल्यास पंपा संच अनुदान मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ होते
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण (Personal Farm Pond Lining)
शेततळ्यांना प्लॅस्टिक अस्तरीकरण (lining) देण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध आहे पाणीसाठवण क्षमता वाढवण्यासाठी हा घटक अत्यंत उपयुक्त आहे
आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील हमी पत्र 3 नंबर
नवीन सातबारा उतारा तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी
नवीन 8 अ उतारा
सरकारी जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदाराची संमती पत्र
ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात आणि प्रकल्पास मंजुरी दिली जाते
कधी जुनी न होणारे योजना खास तुमच्यासाठी
Maharashtra Dairy scheme 2025 अंतर्गत व्यवसायाला नवी दिशा मिल्किंग मशिन खरेदीवर 50% अनुदान
कृषी समृद्धी योजना 2025 शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे सुविधा केंद्र व BBF यंत्रासाठी अनुदान
मागेल त्याला शेततळे योजना 2025
How to apply for Drip irrigation subsidy Maharashtra ठिबक सिंचन सबसिडी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
गाय गोठा अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत थेट आर्थिक साहाय्य मिळवण्याची सुवर्णसंधी
भाजीपाला रोपवाटिका (Vegetable Nursery Subsidy)
भाजीपाला पिकासाठी उच्च दर्जाची रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना रोपवाटिका सहाय्य दिले जाते आवश्यक कागदपत्रे
तलाठी सही असलेला नवीन सातबारा
तलाठी सही असलेला नवीन 8 अ
जमिनीचा नकाशा
जमिनीच्या चारही बाजूची माहिती
सरकारी नमुन्यातील हमीपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
या कागदपत्राच्या आधारे तुमच्या शेतावर रोपवाटिका उभरण्यास मदत मिळते
Download documents in PDF
वैयक्तिक शेततळे (NFSM /MTS योजनेअंतर्गत )
NFSM आणि MTS योजनेअंतर्गत शेततळे तयार करण्यासाठी सरकार 50% ते 75% पर्यंत अनुदान देते आवश्यक कागदपत्रे
- नवीन सातबारा उतारा तलाठी सही डिजिटल
- नवीन 8अ उतारा
- जमिनीची मर्यादा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- लाभार्थ्याकडे किमान 0.60 हेक्टर स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक
- 0.70 पेक्षा कमी जमीन असल्यास या घटकांसाठी अर्ज स्वीकारला जात नाही
कागदपत्र का महत्त्वाचे आहे
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना कागदपत्राची अचूकता आणि स्पष्टता अत्यंत महत्त्वाचे असते ही कागदपत्रे खालील बाबी सिद्ध करतात
जमीनीच्या नावावर आहे का
प्रकल्पासाठी जागा योग्य आहे का
प्रकल्प सरकारी नियमानुसार आहे का
जात प्रमाणपत्र नुसार तुम्हाला किती अनुदान मिळू शकते
सामाईक जमिनीवर इतर खातेदारांची समिती आहे का आणि कर्ज नाकारले जाण्याची मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे आणि अपूर्ण किंवा चुकीची असणे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासा आणि डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रत अपलोड करा
महाडीबीटी वर अर्ज कसा करावा सोप्या पद्धतीने जाणून घ्या
महाडीबीटी पोर्टल उघडा mahadbt.maharashtra.gov.in शेतकरी नोंदणी (farmer registration) पूर्ण करा Aadhar OTP द्वारे लॉगिन करा Department of Agriculture निवडा आपली योजना निवडा Pump, Farm Pond, Nursery इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा Application ID सेव करा
निष्कर्ष : महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असते डिजिटल व्यासपीठ आणि पंपसंच, शेततळे, रोपवाटिका सिंचन सुविधा पाण्याचे व्यवस्थापन अशा विविध योजनेकरता राज्य सरकार मोठे अनुदान उपलब्ध करून देते या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे तयार ठेवणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे वरील माहितीच्या आधारे तुम्ही सहज सोप्या आणि जलद पद्धतीने तुमचा अर्ज सामील करू शकता





