जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते शासनाने नुकसानीपोटी तब्बल 431.81 कोटीचा निधी मंजूर केला असला तरी अद्याप फक्त 46.46 टक्के याद्या अपलोड झाल्या असल्याने मदत वितरण प्रक्रियेत मोठा विलंब होत आहेत
शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा
जुलै ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यांमधील झालेल्या अतिवृष्टीत पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते जिल्हा परिषद तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जिल्हा अधिकारी आशमा मित्तल यांनी संबंधित यंत्रणेला याद्या अपलोड करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले होते मात्र आतापर्यंत फक्त 6 लाख 29 हजार 651 खातेदारांपैकी तीन लाख 20 हजार 450 खातेदारांचे डेटा पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहेत
घनसावंगी आणि अंबड तालुके पिछाडीवर
घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये सध्या या द्या अपलोड करायचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे राज्य मध्ये गाजलेल्या घोटाळ्यामुळे या दोन्ही तालुक्यातील अनेक तलाठी तसेच कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक निलंबित कर्मचारी सध्या अपुरी आहे यामुळे नव्या अधिकारावर दुहेरी जबाबदारी पडली असून कामकाजावर परिणाम झाला आहे
तालुकानिहाय अपलोड प्रगतीचा आढावा
| अपलोड याद्या | बाधित खातेदार | तालुका |
| 36,819 | 65,537 | बदनापूर |
| 73,165 | 1,08,471 | भोकरदन |
| 42,488 | 90,016 | जालना |
| 22,529 | 33,269 | जाफराबाद |
| 25,494 | 58,421 | परतुर |
| 40,481 | 71,293 | मंठा |
| 34,400 | 96,794 | घनसावंगी |
| 45,074 | 1,05,850 | अंबड |
विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
यंत्रणांवर वाढलेला ताण तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे झालेल्या अडचणी तसेच घोटाळ्यानंतर वाढलेली सावधान यामुळे प्रक्रिया धीमी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास विलंब होत आहे अनेक शेतकरी कधी पैसे खात्यावर पडतीलया प्रतीक्षेत आहे मात्र आता अजून किती वेळ लागतो याच्यावर सांगता येत नाही
निष्कर्ष अतिवृष्टीमुळे झालेल्या याचा फटका आधीच असलेल्या शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या विलंबाचा धक्का बसत आहे मात्र शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने पोहोचवण्यासाठी यंत्रणा गती देणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना अडचणी मध्ये आणखीन भर पडू शकतो





