PM-Kisan योजनेतील मोठा बदल – ‘Voluntary Surrender’ केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा pm kisan beneficiary list 2025

PM किसान योजनेत एका छोट्याशा चुकीमुळे हप्ता बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. pm kisan beneficiary list 2025

गेल्या काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर “Voluntary Surrender” नावाचा एक पर्याय देण्यात आलेला होता. या पर्यायाद्वारे जर एखाद्या शेतकऱ्याला स्वेच्छेने योजनेचा लाभ सोडायचा असेल, तर तो लाभ सोडू शकत होता.

मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळे, उत्सुकतेपोटी त्यांनी या पर्यायावर क्लिक केले. यामुळे त्यांच्या हप्त्यांचा प्रवाह थांबला. काही शेतकऱ्यांनी केवळ ‘हे काय आहे?’ हे पाहण्यासाठी क्लिक केले आणि त्याचा गंभीर परिणाम म्हणून त्यांचे हप्ते बंद झाले. या पर्यायावर एकदा क्लिक केल्यानंतर, नवीन नोंदणी करता येत नव्हती, आणि लाभार्थी म्हणून पुन्हा पात्र होणे शक्य नव्हते.

पण आता या संदर्भात एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी चुकून ‘Voluntary Surrender’ पर्याय निवडला होता, त्यांच्यासाठी आता पुन्हा हप्ता सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

PM किसान पोर्टलवर “Voluntary Surrender Revocation” (Revoke) नावाचा नवीन पर्याय जोडण्यात आलेला आहे.


ही प्रक्रिया कशी करावी?

  1. PM-Kisan पोर्टलला भेट द्या.
  2. मेन्यूमध्ये “Voluntary Surrender Revoke” या पर्यायावर क्लिक करा.
  3. आपला नोंदणी क्रमांककॅप्चा कोड टाका.
  4. मोबाईलवर आलेला OTP टाका आणि तो व्हेरिफाय करा.
  5. आपली माहिती दाखवली जाईल – रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर इ.
  6. खाली दिलेल्या स्वयघोषणापत्रावर टिक करा.
  7. “Proceed” वर क्लिक करा.
  8. अटी व शर्ती वाचा, सहमती दर्शवा, आणि पुन्हा Proceed करा.
  9. आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाका आणि तो व्हेरिफाय करा.
  10. “Voluntary Surrender Revoke” यशस्वी झाल्याचा मेसेज दाखवला जाईल.

यामुळे काय होणार?

या प्रक्रियेनंतर, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले होते, ते पुन्हा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत आणि पुढील हप्ते त्यांना मिळणार आहेत.

  • पीएम किसान योजना नवीन अपडेट 2025
  • Voluntary Surrender Revoke माहिती
  • पीएम किसान हप्ता बंद झाल्यास उपाय
  • शेतकरी हप्ता पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
  • पीएम किसान पोर्टल नवीन ऑप्शन
  • पीएम किसान योजनेत चुकून हप्ता बंद
  • पीएम किसान योजना रिवोक प्रक्रिया
  • Voluntary Surrender चुकीने क्लिक केल्यास काय करावे
  • शेतकऱ्यांसाठी पीएम किसान अपडेट
  • पीएम किसान नवीन पर्याय 2025

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment