“महाविस्तार” ॲप – शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पाऊल What is Mahavistar App?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 21 मे रोजी कृषी विभागाने (Mahavistar App Download) ‘महाविस्तार’ नावाचं एक नवीन ॲप लॉन्च केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनानंतर सांगितलं की, या ॲपमुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत मोबाईलवरच एका क्लिकवर मिळू शकणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की, Mahavistar App हे महाविस्तार ॲप नेमकं काय आहे? त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे?

कार्यक्रमाचा आढावा

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 21 मे रोजी खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात कृषी विभागाच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्सूनचा अंदाज, बियाणं व खतांचा पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला गेला. यानंतरच महाविस्तार ॲप सादर करण्यात आलं.


What is Mahavistar App? महाविस्तार ॲप म्हणजे काय?

महाविस्तार हे AI आधारित ॲप आहे. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे ॲप तयार करण्यात आलं आहे.
हे ॲप पूर्णपणे मराठीत असून, शेतकऱ्यांना खालील प्रकारची माहिती देतं:

  • पीक व्यवस्थापन
  • कीड व्यवस्थापन
  • हवामानाचा अंदाज
  • बाजारभाव (रिअल टाईम)
  • तंत्रज्ञानसंबंधित माहिती
  • DBT (Direct Benefit Transfer) योजनांची स्थिती

AI चॅटबॉट सेवा – २४x७ मदत

या ॲपमध्ये AI चॅटबॉट सुविधा आहे, ज्यामध्ये शेतकरी २४ तास व सातही दिवस कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
उदाहरणार्थ:

  • “माझ्या पिकाला कोणतं खत घालावं?”
  • “पाणी देण्याची योग्य वेळ कोणती?”
  • “आज बाजारभाव काय आहे?”

हे प्रश्न तुम्ही टेक्स्ट किंवा आवाजाच्या स्वरूपात विचारू शकता, आणि चॅटबॉट लगेच उत्तर देतो. यामुळे वेळ आणि श्रमांची मोठी बचत होते.


बाजारभावाची रिअल टाईम माहिती

शेतकरी त्यांच्या तालुक्याच्या बाजार समितीत कोणत्या पद्धतीने शेतमालाचे व्यवहार झाले, त्याला काय दर मिळाला, याची माहिती या ॲपवर पाहू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना वास्तविक बाजारभाव कळतात आणि ते त्यांच्या मालाला योग्य दर ठरवू शकतात.


Mahavistar App Download महाविस्तार ॲप कसे डाऊनलोड कराल?

  1. मोबाईलमध्ये Play Store उघडा.
  2. शोधा – “Mahavistar App”
  3. लक्षात ठेवा – “POCRA” हे अक्षर छोट्या फॉन्टमध्ये खाली लिहिलं असेल.
  4. तेच अधिकृत ॲप डाउनलोड करा.
  5. नोंदणी करा आणि लॉगिन करून वापरायला सुरुवात करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment