ST NCMC Free Travling Card:NCMC कार्ड कार्यप्रणालीच्या मानक कार्यप्रणाली (SOP) बाबत.
संदर्भ – १. या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत/एनसीएमसीकार्ड/८०२, दि.१३.०२.२०२६
२. या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत/१५८२, दि.०२.०४.२०२६
रा.प. महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना रा.प. बसेसमध्ये सवलत देण्यात येते. सदर सवलतधारी प्रवाशांस सवलतीकरिता NCMC कार्ड देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत रा.प महामंडळाद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक यांचे NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही सुरु असून टप्प्याटप्याने इतर सवलतधारी प्रवाशांच्या NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही सुरु करण्यात येणार असून नजीकच्या काळात सर्व सवलतधारी प्रवाशांना रा.प बस प्रवासभाड्यात सवलत प्राप्त करणेसाठी सदरचे एनसीएमसीकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे.
आपणांस या कार्यालयाचे वरील संदर्भिय पत्र क्र. ०१ अन्वये एनसीएमसीकार्ड बाबत सविस्तर परिपत्रकीय सुचना देण्यात आल्या असून पत्र क्र. राप/वाह/सवलत/१५८२, दि.०२.०४.२०२६ अन्वये NCMC कार्डच्या नोंदणीकरण, वितरणाची तसेच NCMC कार्ड वापरून वाहकाच्या ईटीआयमशिनद्वारे तिकीट देण्याच्या तसेच कार्ड टॉपअप करण्याच्या कार्यवाहीची मानक कार्यप्रणाली (SOP) पाठविण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आले आहे.
सबब आपणांस याद्वारे पुनःश्च कळविण्यात येते की, आपल्या अखत्यारितील सर्व आगार व्यवस्थापक यांस सर्व वाहकांना सदर मानक कार्यप्रणाली (SOP) प्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य असलेबाबत (NCMC कार्ड वापरून संबंधित कार्डधारकांस सवलतीचे तिकीट देणे, कार्ड टॉपअप करणे इ.) सुचित करण्याबाबत कळविण्यात यावे. सदर बाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.




