पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतनवाढ देणे संदर्भात महत्वपूर्ण GR.Promotion Salary Hike

Promotion Salary Hike:महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) खालीलप्रमाणे तरतूद आहे.

” नियम ११ (१) नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि —

(ए) वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करित असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समयश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे, खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर, आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढीइतकी रक्कम मिळाल्यावर, जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. ”

२. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय, शासन निर्णय प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३२५/२३/सेवा-३ दिनांक ०८-०८-२३ अन्वये प्राप्त मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९२६१६४४३१८३२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Leave a Comment