प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना(पीएमजेजेबीवाय)
2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना सुरू केली.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 मे 2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना सुरू केली या योजनेत भारतातील प्रत्येक नागरिक सहजपणे 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळू शकतो त्यासाठी 436 रुपयांचे वार्षिक प्रीमियम भरावा लागतो
अर्जदाराच्या बचत बँक खात्यातून दरवर्षी 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी कापली जाते जर एखाद्या भारतीय नागरीकाने अर्ज केला आणि अर्जदाराचा अपघाती मृत्यू झाला तर अर्जदाराचा कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची उद्दिष्ट
भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या तसेच इतर योजनांप्रमाणे या प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची देखील काही उद्दिष्टे आहेत
- ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की भारतातील प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबाला अपघातामुळे आर्थिक मदत मिळते.
- अपघातामुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास भारतातील प्रत्येक नागरिकाला दोन लाख रुपयांचे थेट कव्हरेज प्रदान करणे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचे लाभार्थी
पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजनेमध्ये भारतातील प्रत्येक नागरिक अर्ज करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना पात्रता
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- भारतातील प्रत्येक नागरिक या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे.
- आधार क्रमांक अर्जदाराच्या बँक खात्याशी जोडलेला असावा.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची अर्ज प्रक्रिया
- जर तुम्हाला या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (पीएमजेजेबीवाय) अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी आणि खासगी विमा कंपनीशी किंवा कोणत्याही बँकेशी संपर्क साधावा लागेल.
- तिथे गेल्यानंतर या योजनेची अधिक माहिती घेऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर www.myscheme.gov.in वर क्लिक करून तुम्हाला अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
- आता तो अर्ज जवळच्या बँकेच्या शाखेत किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जमा करावा लागेल.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल.