देशातील सगळे शेतकरी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून कोणत्याही पिकासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.शासन प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई देते.
काय आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा हेतू भारतातील प्रत्येक शेतकरी अवकाळी आलेल्या संकटांमुळे शेतीचे होणारे नुकसान किंवा काही शेतीविषयक मशनरी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
भारतातील जे शेतकरी याच्यामध्ये सहभागी आहेत असे की काही अवकाळी झालेल्या पावसामुळे अथवा काही दुष्ष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान 50% पेक्षा जास्त होत असेल, तर या योजनेमार्फत त्यांना नुकसान भरपाई मिळते प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत आतापर्यंत बरे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा उद्देश
भारत शासनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या गेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानी ही योजना यासाठी सुरू केलेली आहे.की झालेल्या नुकसानीत शासनाकडून आर्थिक सहाय्यता मिळाल्यानंतर पुन्हा शेती करता यावी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत शेतीसाठी कर्ज मिळू शकते.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे लाभार्थी
भारतातील प्रत्येक शेतकरी अर्ज करून या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकतो.
बाकीच्या योजना सारखे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे काही पात्रता असणे गरजेचे आहे.शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारतातील नागरिक असावा अर्जदार हा एक शेतकरी असावा जर काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यामुळे शेतीचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे जरुरी कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पत्ता
- ओळखपत्र
- राशन कार्ड
- सातबारा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- बँक अकाउंट नंबर ( जो की आधार लिंक असावा)
पीएम फसल बीमा योजना ऑनलाइन अर्ज
जर तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी ऑनलाईन अर्जासाठी खाली दिल्या गेलेल्या माहिती भरावी.
स्टेप 1: सगळ्यात अगोदर तुम्हाला या लिंक वर जावं लागेल https://pmfby.gov.in ही वेबसाईट ओपन करावे.
स्टेप2: वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर फार्मर कॉर्नर ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप 3: पुढच्या पेजवर आल्यानंतर गेस्ट फार्मर ऑप्शन वर क्लिक करावे .
स्टेप 4: गेस्ट फार्मर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये शेतकऱ्याची माहिती संपूर्ण भरावी खाली कपच्या कोड टाकावा आणि क्रिएट यूजर ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप 5: आता तुम्हाला परत लॉगिन पेजवर येऊन लॉगिन फॉर फार्मर ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 6: पुढच्या पेजवर आल्यानंतर ज्या मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन केलं आहे तो टाकावा लागेल आणि कपच्या कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप 7: आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी आलेला असेल तो टाकून सबमिट करावा.
स्टेप 8: लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तिथे सगळी माहिती टाकून शेवटी डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करावे लागेल.