प्रधानमंत्री आवास योजना हे केंद्र शासनाची योजना आहे.या योजनेला केंद्र शासनाने 2024 मध्ये जास्त महत्त्व दिले आहे.फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा संसदेत बजेट सादर केलं गेलं होतं तेव्हा, भारतीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजनांमधून आवास योजनेला जास्त महत्त्व दिले.चला तर मग बघूया या योजनेबद्दल माहित.
काय आहे पीएम आवास योजना
“प्रधानमंत्री आवास योजना” ही काही नवीन योजना नाही.नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनण्याअगोदर, ही योजना “इंदिरा आवास योजना” या नावाने सुरू होती परंतु या योजनेचे लाभार्थी कमी होते, जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा 2016 मध्ये इंदिरा आवास योजनेचे नाव “प्रधानमंत्री आवास योजना” असे केले आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम जोरात सुरू झाले.या योजनेचा ग्रामीण आणि शहरी भागात खूप लोकांना फायदा झाला.
पीएम आवास योजनेचे उद्देश
प्रधानमंत्री आवास योजना 2016 मध्ये सुरू केली होती.जिचा उद्देश भारतातील सगळ्या गरीब लोकांना जसे की ज्यांच्याकडे पक्के घर नाही, आणि ज्यांच्याकडे पडलेले असे घर आहेत, अशा लोकांना 2022 पर्यंत घर बांधण्यासाठी सुविधा दिल्या.
पीएम आवास योजनेचा प्रकार
प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन प्रकार आहेत.एक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे दोन प्रकार आहेत.
पीएम आवास योजना ग्रामीण
पीएम आवास योजना ग्रामीण याचा उल्लेख असा आहे की, लाभार्थ्याला शासनाकडून मिळायला पैसा वापस करावा लागत नाही.
पीएम आवास योजना शहरी
पीएम आवास योजना शहरी मध्ये शासनाकडून लाभार्थ्याला दिला जाणारा पैसा, कमी व्याज आणि कर्जाच्या स्वरूपात दिला जातो.जो की बाबा त्याला शासनाला परत करावा लागतो.
पीएम आवास योजनेसाठी अर्ज
पीएम आवास योजना ही ग्रामीण आणि शहरी लोकांसाठी वेगवेगळ्या आहे.याची अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे, तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणच्या कार्यालयात याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
