प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना बिना गॅरंटी 50 हजार रुपये कर्ज (लोन) दिले जाते.
काय आहे पी एम स्व निधी योजना
भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी नवीन उद्योग सुरू करू इच्छित असणाऱ्यांना “पी एम स्वनिधी” योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन सहज उद्योग सुरू करता येऊ शकतो.यासाठी गॅरंटी साठी काही वस्तू ठेवायची गरज नाही.हे लोन बिना गॅरंटी भारत सरकारच्या मदतीने सहज बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते.
प्रधानमंत्री स्व निधी योजनेमध्ये भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील स्ट्रिट वेंडर्स ना प्राथमिकता दिली गेली.कोणत्याही प्रकारचा व्यवसाय विक्रेता या योजनेमार्फत लाभ घेऊ शकतो.
2020 मध्ये सुरू झालेल्या योजनेला 2022 पर्यंत सक्रिय होते, त्यानंतर या योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत वाढवला गेला होता.या योजनेकडून 10000 रुपये पासून तर 50 हजार रुपये पर्यंत लोन मिळते, त्याची परतफेड एक वर्षेपर्यंत करता येते.त्यासोबतच तुम्हाला शासनाकडून 7℅ सूट पण मिळेल, जर कोणी लोणचे रिपेमेंट बँक ट्रान्सफर यूपीआयकडून डिजिटायझेशन करत असेल तर कॅशबॅक मार्फत बाराशे रुपयांची सूट मिळते.
PM Svanidhi Loan Limit
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये लोणचे लिमिट तीन पद्धतीने आहे.पहिले 10000 रुपये दुसरी 20000 रुपये आणि तिसरी 50 हजार रुपये तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचे कर्ज यापैकी घेऊ शकता.
पण ह्या लोनचा लाभ घेण्यासाठी एल ओ आर नंबर ची आवश्यकता आहे.जी शहरी भागात नगर नियम द्वारा दिले जाते, परंतु आता पोर्टलमध्ये एक नवीन विकल्प जोडला गेला आहे.जिथे लोन साठी बिना लायसन्स अप्लाय करू शकता.
पी एम स्वनिधी योजना उद्देश
1. लॉक डाऊन मध्ये अडकलेले स्ट्रीट वेंडर्स चा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न.
2. स्ट्रिट वेंडर्स ना लोन आणि आर्थिक मदत देऊन सशक्त बनवणे.
3. रस्त्यावरील विक्रेत्यांना लॉकडाऊन मध्ये आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी.
पी एम स्व निधी योजना पात्रत पात्रता
• शहरी भागातील काम करणारे आणि गल्लोगल्ली फिरणाऱ्या पथविक्रेत्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
• अर्जदाराचे वय 18 वर्षे पासून 65 वर्षे पर्यंत पाहिजे.
• नागरिकता प्रमाणपत्र/ आधार कार्ड द्वारा योजनेमध्ये नोंदणी.
• व्यवसायिकाला कोणत्याही बँकेचे लोन मिळालेले नाही पाहिजे.
पी एम स्वनिधी योजना आवश्यक डॉक्युमेंट
1. अर्जदाराचे आधार कार्ड ज्याचा मोबाईल नंबर लिंक असावा
2. इलेक्शन कार्ड
3. बँक पासबुक
4. पासपोर्ट फोटो
5. नगर नियम द्वारा व्यवसाय प्रमाणपत्र
पी एम स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन
- https://pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर या.
- 10000,20000,50000 यापैकी तुम्हाला किती हवे असेल तेवढं लोन सिलेक्ट करावे लागेल.
- जर अर्जदाराकडे नगर नियम द्वारा प्रमाणपत्र नसेल तर अर्जदारास दहा हजार रुपये लोन मिळेल यासाठी lor cum loan विकल्प वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला ओटीपी व्हेरिफिकेशन करा.
- आता पुढचं पेज ओपन झालं त्यावर सगळी माहिती भरा.
- शेवटच्या पेजवर सगळी माहिती चेक करून सबमिट क्लिक करा.
पीएम स्वनिधी योजना ऑफलाइन अर्ज
- आपल्याजवळ असलेल्या सरकारी बँकेत जा.
- योजनेची जोडलेल्या बँक अधिकाऱ्यांना पीएम स्वनिधी योजनेविषयी विचारा.
- जर तुम्ही पात्र अर्जदार असाल तर बँक कर्मचारी तुम्हाला योजना फॉर्म भरण्यासाठी मदत करतील.
- सगळी माहिती व्यवस्थित भरून बँक अधिकाऱ्यांकडे जमा करा.
- आता तुमचे अर्ज बँक अधिकारी सत्यापित करून तुमच्या खात्यात लोन जमा करतील.