पीएम श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana)

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही एक सामाजिक कल्याण योजना आहे.जी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकारच्या श्रमनियोजन मंत्रालयाने फेब्रुवारी 2019 मध्ये विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना मदत करण्यासाठी सुरू केली होती.या योजनेअंतर्गत कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते .

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्टे

आम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या उद्दिष्टांची यादीनुसार चर्चा केली आहे .

  • ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की, सध्या भारतात सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत.ज्यांच्या कुटुंबात पैसे अभावी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.म्हणूनच भारत सरकारने असंघटित कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शन योजना सुरू केली आहे.जिथे त्यांना दरमहा चांगल्या रकमेसह आर्थिक लाभ मिळेल .
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की, असंघटित कामगारांना वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा कव्हरेज प्रदान करणे हा आहे. असंघटित कामगारांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.
  • ही योजना सुरू करण्याचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे, असंघटित कामगारांमध्ये बचतीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे जेणेकरून 60 वर्षानंतर त्यांचे आर्थिक समर्थन वाढेल ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरता वाढेल .
  • प्रधानमंत्री श्रमयोगी योजना सुरू करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे असंघटित कामगारांचे त्यांच्या कुटुंबावर किंवा त्यांच्या वृद्धावस्थेत कोणत्याही बाह्य समर्थन प्रणालीवरील अवलंबित्व कमी करून, यामुळे पुढील वर्षभरात त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबावरील भार कमी होईल .

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ

सध्या भारतात सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत.असंघटित कामगारांचे श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले सर्व कामगार, या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचे लाभ मिळवू शकतात .

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, जे लोक रोजंदारीवर काम करणारे, रस्त्यावर दुकान लावणारे, रिक्षा चालवणारे, गाड्या ओढणारे, एखाद्याची गाडी किंवा बस चालवणारे, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, मच्छिमार, पशुपालन करणारे, घरांमध्ये काम करणाऱ्या मोलकरीण आणि आण सफाई कामगार ही या श्रेणीत येतील.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना पात्रता

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार असंघटित कामगार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कामगाराचे मासिक उत्पन्न 15,000रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • अर्जदार कामगाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावे .
  • अर्जदार कामगाराच्या वयानुसार दरमहा जमा केली रक्कम कमी अधिक असू शकते म्हणजे 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील अर्जदार साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत मासिक योगदान दिले पाहिजे.त्याची किंमत 55 रुपये दोनशे रुपये प्रति महिना असू शकते.
  • अर्जदाराला वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल.
  • अर्जदार कामगाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे बचत बँक खाते किंवा जनधन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • कामगार कोणत्याही संघटित क्षेत्राचा संबंधित किंवा सदस्य नसावा.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आवेदन प्रक्रिया

तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी माननीय योजनेसाठी अर्ज कसा करू शकता याबद्दल माहिती खालील प्रमाणे –

Step 1 : सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आणि बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल.

Step 2 : आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना किंवा PM-SYM योजना टाईप करून ठेवावे लागेल.

Step 3 : शोधल्यानंतर तुम्हाला मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यावे लागेल.

Step 4 : येथे आल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन पर्याय मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सेल्फ एनरोलमेंट पर्यावरणावर क्लिक करावे लागेल.आणि तुमचा मोबाईल नंबर आणि मोबाईल वर प्राप्त झालेल्या ओटीपी सह लॉग इन करावे लागेल.

Step 5 : लॉगिन पूर्ण झाल्यावर तुम्हाला जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा लागेल त्यानंतर तुम्ही फॉर्म पूर्णपणे भरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a Comment