शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” एक 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी ₹2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी ₹6000 ची रक्कम दिली जाते.ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते.सुरुवातीला केवळ दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते, परंतु आता देशातील सर्व शेतकरी या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता.
पी एम किसान मानधन योजना ही योजना देखील केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुरू केली आहे.आतापर्यंत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान चे 16 हप्ते पाठवले आहेत.शेवटचा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला आहे.16 व हप्ता अद्याप जर तुमच्या खात्यात जमा झाला नसल्यास तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला या लेखात सांगितली आहे .
पी एम किसान सन्मान निधी योजना
PM Kisan Samman Nidhi Yojana केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ₹6000 रुपयांची रक्कम दिली जाते.हा हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो जो थेट बँकेत (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जातो.पी एम किसान योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षभरात 75000 कोटी रुपये खर्चाचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.
पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मानित योजने अंतर्गत 16 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.अशा देशभरातील शेतकरी पीएम किसान या 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, सरकारकडून लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.
जर तुम्ही 17 हप्त्यापूर्वी पीएम किसानचे eKYC केले नसेल तर तुम्ही ते त्वरित पूर्ण करावे j PM किसान च्या लाभार्थ्यांसाठी सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे.त्यामुळे 17 हप्त्याचे पैसे देखील केवळ केवायसी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केले जातील.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2024 चे उद्दिष्ट
केंद्र सरकारचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश, देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.भारत हा एक कृषीप्रधान देश असून 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत.सर्वांना माहित आहे की अनेक वेळा शेतकऱ्यांना शेतीत नुकसान सहन करावे लागते.आणि शेतीशी संबंधित अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.
त्यामुळे देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले जीवनमान मिळेल आणि या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी स्वावलंबी आणि सक्षम बनवू शकतील.
पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता (Eligibility)
किसान सन्मान निधी योजनेसाठी काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आले आहे, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा भारतीय असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी शेतकरी हा कोणत्याही शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
- यापूर्वी केवळ 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता, परंतु आता सर्व शेतकरी योजना साठी पात्र आहेत.
- अर्जदार शेतकऱ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे कारण किसान सन्मान निधी योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वाटप केली जाईल.
पीएम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर एखाद्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते खालील प्रमाणे –
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- मतदान कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स इ.
- जमिनीची कागदपत्रे
- शेतीचा तपशील
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पीएम किसान सन्मान निधी योजना 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
देशातील अशी इच्छुक शेतकरी ज्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करायची आहे, तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता.-
- पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला “farmers corners” च्या अंतर्गत नवीन शेतकरी नोंदणीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- आता नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर पुढील पानावर उघडेल.
- आता येथे तुम्हाला शेतकरी नोंदणीसाठी शहरी आणि ग्रामीण भागाचा पर्याय दिसेल –
- Rural Farmer Registration( जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल)
- Urban Farmer Registration ( जर तुम्ही शहरी भागातील रहिवासी असाल)
- तुम्ही ज्या क्षेत्राचे आहात त्यानुसार पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि राज्य निवडावे लागेल .
- आता तुम्हाला तिथे दिलेला कॅपच्या कोड भरा आणि send OTP वर क्लिक करा.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल जो तुम्हाला ओटीपी बॉक्समध्ये भरावा लागेल .
- आता पुढील पेजवर तुम्हाला काही वैयक्तिक तपशील आणि जमिनीचे तपशील भरावे लागतील.
- सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागेल .
- अशाप्रकारे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे .
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा
देशातील जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत, ते ऑफलाइन देखील अर्ज करू शकतात.पीएम किसान ऑफलाइन नोंदणीसाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज डाऊनलोड करावा लागेल.त्यानंतर तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल, आणि तुमच्या जवळच्या CSC सेवा केंद्रामध्ये जमा करावा लागेल तिथे त्या अर्जाची छाननी केली जाईल आणि किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुमची नोंदणी केली जाईल त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणे सुरू होईल .
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहावी
ज्या शेतकऱ्याने किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे, ते आता पी एम किसान लाभार्थी यादी तपासू शकतात.जर तुम्हाला तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये पहायचे असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार बघावी –
- पीएम किसान लाभार्थी यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्या वेबसाईटच्या होम पेजवर केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल .
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल येथे तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी काही तपशील निवडावे लागतील.
- सर्व तपशील निवडल्यानंतर “गेट रिपोर्ट “या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही क्लिक करतात तुम्हाला स्क्रीनवर किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यांची यादी दिसेल या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
पीएम किसान योजना e-KYC करण्याची प्रक्रिया
केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येत नसल्यास तुम्ही लवकरात लवकर e-KYC करून घ्यावी .
- पीएम किसान e-KYC करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जावे लागेल .
- या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला ती केवायसी च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल नंतर तुम्ही एका नवीन पेजवर याल .
- या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च बटनवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, तो तुम्हाला बॉक्स मध्ये टाकावा लागेल .
- यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल .
- अशाप्रकारे तुमची पी एम किसान योजना e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .
पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या लाभार्थ्यांची स्थिती कशी तपासावी
- पीएम किसान लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जा .
- या वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता पुढील पेजवर तुम्हाला लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांकाचा पर्याय मिळेल .
- तुम्हाला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅपच्या कोड भरावा लागेल .
- यानंतर तुम्हाला Get Data बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी स्थिती दिसेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न.1 पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे ?
उत्तर – पीएम किसान निधी सन्मान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे याचा उद्देश भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे .
प्रश्न. 2 पीएम किसान योजना कधी सुरू करण्यात आली?
उत्तर – पीएम किसान योजना एक डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली.
प्रश्न . 3 पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
उत्तर – पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in ही आहे .
प्रश्न.4 पीएम किसान योजनेसाठी काही हेल्पलाइन नंबर आहे का ?
उत्तर – होय, पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 आणि 155261 आहेत .
प्रश्न.5 पीएम किसान नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?
उत्तर – आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज आणि बँक खात्याचा तपशील समाविष्ट आहे .