सरकारकडून खूप साऱ्या योजना देशातील जनतेसाठी सुरू केले आहे.या योजनेबरोबरच सरकारने ही एक सायकल योजना पण सुरू केली आहे (Nrega Free Cycle Yojana) .जर तुम्ही भारतीय नागरिक असेल आणि मजुरी करत असाल, तर तुम्ही सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता.
केंद्र शासनाकडून भरपूर योजना गरिबांसाठी चालवल्या जातात प्रत्येक काम करणारा मजुर या योजनेचा लाभ घेऊ शकतो.केंद्र शासनाकडून मोफत सायकल योजना सुरू केली आहे, या मध्ये सर्व लाभार्थी पात्र राहतील जे कि नरेगा मध्ये मजुरी काम करत असतील किंवा इ श्रम कार्ड धारक मजुरी काम करत असतील हे सर्व या योजनेत पात्र राहतील.
Nrega Free Cycle Yojana : शासनाच्या या मोफत सायकल योजनेमध्ये शासनाकडून तीन ते चार हजार रुपये इतकी रक्कम बँक खात्यात दिली जाणार आहे.अशाप्रकारे तुम्ही मोफत सायकल योजनेचा लाभ घेऊ शकता, यासाठी सायकल तुम्हाला स्वतः खरेदी करावे लागेल आणि पैसा तुम्हाला शासनाकडून बँक खात्यात मिळेल.
मोफत सायकल योजना 2024
या योजनेचा उद्देश असा आहे, जे मजूर लोक मजुरी करण्यासाठी चालत जातात तसेच नरेगा मध्ये काम करणारे मजूर नरेगा कामाच्या ठिकाणी पायी चालत जातात, त्यांच्यासाठी ही योजना शासनाने काढली आहे.यामुळे मजूर कामावर वेळेवर पण पोहोचेल आणि त्याला होणारा चालत जाण्याचा त्रास पण वाचेल.शासनाने ही योजना काही राज्यांमध्ये सुरू केली आहे आणि त्यांचे पैसे मिळणे पण सुरू झाले आहे.
नरेगा मोफत सायकल योजना
मोफत सायकल योजना मध्ये ऑफलाइन माध्यमातून अर्ज नरेगा कर्मचाऱ्यांकडूनच केले जातील.या योजनेत अर्ज केल्यानंतर जो बँक खाते क्रमांक तुम्ही फॉर्म भरतेवेळी दिला आहे, त्यावरच तीन ते चार हजार रुपये इतकी रक्कम तुम्ही प्राप्त करू शकाल हेच तुमचे मोफत सायकल अनुदान आहे.त्यात तुम्ही सायकल घेऊ शकता आणि नरेगा कामाच्या ठिकाणावर जाऊन वेरिफिकेशन म्हणजेच फोटो काढून मोफत सायकल मिळाल्याचे पुरावे देखील देऊ शकता.शासनाची ही मोफत सायकल योजना ही मजूर कामगारांसाठी उपयोगी आहे.यात मिळणारे पैसे तीन ते चार हजार रुपये इतकी रक्कम सायकल विकत घेऊन कामाच्या ठिकाणी जाऊ शकता.