mukhyamantri pashudhan vikas yojana : 50 शेळ्या पाच बोकड गटासाठी मोठी संधी, अनुदान, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी होणार

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बेरोजगार युवक युवती व महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्याकरिता राज्य शासन मुख्यमंत्री ग्रामीण पशु धन उद्योजकता विकास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे या योजनेबाबत 10 एप्रिल 2020 रोजी राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्नाचे आव्हान केले असून या योजनेद्वारे पशुपालनाला केवळ पारंपारिक व्यवसाय ठेवता उद्योजकतेचे स्वरूप देण्यावर शासनाचा भर आहे या योजनेतून 50 शाळा व पाच बोकड गट पाच गाई किंवा पाच म्हशीचे गट तसेच आवश्यक पायाभूत सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे विशेष म्हणजे या योजनेसाठी 2026- 27 या आर्थिक वर्षात 4 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे

mukhyamantri pashudhan vikas yojana : योजनेचे उद्देश

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रात व्यवसायाच्या स्वरुपात संधी उपलब्ध करुन देणे हा आहे आतापर्यंत अनेक योजना फक्त जनावरांचे वाटप करण्यापुरता मर्यादित होत्या मात्र या योजनेत पशुधन खरेदी शेड बांधकाम सोलर सुविधा कडबा कुट्टी यंत्र विमासंरक्षण यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधा सामाविष्ट करुन संपूर्ण व्यवसाय मॉडेल तयार करण्यात आला आहे यामुळे लाभ दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतात

अधिकृत GR पहा

mukhyamantri pashudhan vikas yojana योजनेअंतर्गत उपलब्ध प्रकल्प

या योजनेअंतर्गत 2 स्तरावर प्रकल्प राबवले जाणार आहे जिल्हास्तरीय लघु प्रकल्प यामध्ये खालील गटाचा समावेश आहे

  • 50 शेळ्या + 5 बोकड
  • 50 मेंढ्या + पाच मेंढे
  • 5 गाई किंवा 5 म्हशी

राज्यस्तरीय मोठे प्रकल्प : मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय उभारण्यासाठी मोठ्या क्षेत्राचे प्रकल्प मंजूर केले जाणार आहे

50 शेळ्या व 5 बोकड गटाची एकूण प्रकल्प किंमत

या गटासाठी अंदाजे प्रकल्प खर्च पुढील प्रमाणे आहे

अनुदान मानक किमती
प्रति शेळी मानक किंमत12,000
प्रति बोकड अनुदान मानक किंमत15,000
पशुधन गटाची एकूण किंमत6,75,000
तीन वर्षाचा विमा सुमारे 10,1,554
शेड बांधकाम 2,00,000
कडबा कुट्टी यंत्र 30,000
सोलर सुविधा 3 किलो वॅट₹1,32,000
एकूण प्रकल्प खर्च अंदाजे11,38,54

mukhyamantri pashudhan vikas yojana अनुदानाचे प्रमाण प्रवर्गनिहाय

या योजने अंतर्गत विविध प्रवर्गानुसार अनुदानाचे वाटप प्रमाण वेगवेगळे आहे

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती

75 टक्के अनुदान अंदाजे 8.53 लाख पर्यंत

ओबीसी /सर्वसाधारण प्रवर्ग

50 टक्के अनुदान अंदाजे 5. 69 लाख पर्यंत अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार आहे शेड व साहित्य पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता पशुधन खरेदीनंतर दुसरा हप्ता

mukhyamantri pashudhan vikas yojana योजनेचे विशेष सुविधा

या योजनेची खास वैशिष्ट्ये तीन वर्षाचा विमा संरक्षण सोलर ऊर्जा सुविधा शेड बांधकाम खर्च कडबा कुट्टी मशीन पशुधन अनुदान स्थानिक हवामानानुसार पशुधन निवड यामुळे पशुपालन व्यवसाय अधिक सुरक्षित आणि टिकाऊ होणार आहे

mukhyamantri pashudhan vikas yojana पात्रता आणि निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • स्वतःची जमीन असावी
  • जमीन नसल्यास किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा हा आवश्यक आहे
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
  • प्रशिक्षण नसल्यास किमान 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ
  • मागील तीन वर्षात पशुपालनाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा

प्राधान्यक्रम

लाभार्थी निवड करताना पुढील घटकांना प्राधान्य दिले जाईल

महिला बचत गट सदस्य 
दिव्यांग लाभार्थी 15% आरक्षण 
महिला लाभार्थी 30% आरक्षण 
अतिलघु  भूधारक (1 हेक्‍टरपर्यंत जमीन) 
लघुलघु भुधारक (2 हेक्टर पर्यंत जमीन) 
वन हक्क धारक 

आवश्यक डॉक्युमेंट

अर्ज करताना पुढील कागदपत्राची आवश्यकता असते 7/12 उतारा नोंदणीकृत भाडेपट्टा करार लागू असल्यास पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र (पर्यायी) आधार कार्ड बँक खाते पासबुक जात प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) लाभार्थ्यास महिला बचत गट सदस्य प्रमाणपत्र ही कागदपत्र अर्ज होण्यापूर्वी तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असेल

प्रशिक्षण प्रमाणाचे महत्व

या योजनेमध्ये प्रशिक्षण प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रशिक्षण खालील ठिकाणी उत्तर कृषी विज्ञान केंद्र KVK पशुसंवर्धन विभाग माननीय मान्यताप्राप्त व प्रशिक्षण संस्था पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय

प्रशिक्षण घेतल्यामुळे रोग व्यवस्थापन आहार नियोजन उत्पादन वाढ हार्दिक नियोजन यामध्ये मदत होते

mukhyamantri pashudhan vikas yojana: पशुधन खरेदी प्रक्रिया

पशुधन खरेदी पुढील स्रोतांमधून केली जाऊ शकते पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी विकास महामंडळ चे पशुधन अभियानांतर्गत बिल्डिंग फॉर्म स्मार्ट प्रकल्प केंद्र स्थानिक उपलब्धतेनुसार शेळ्यांना वय एक ते तीन वर्षे असणे आवश्यक असते विमा संरक्षण योजना 1ते तीन वर्षाचा विमा संरक्षण संयुक्त विमा लाभार्थी पशुसंवर्धन अधिकारी मृत्यू झाल्यास पुनर वाटप त्यामुळे आर्थिक जोखीम कमी होते

mukhyamantri pashudhan vikas yojana अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल पशुसंवर्धन विभागाचे पोर्टल तयार लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार अर्ज छाननी प्रक्रिया होणार पात्र लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष यादी तयार होणार एप्रिलमध्ये ते जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे

प्रोजेक्ट रिपोर्ट आवश्यक आहे का या योजनेत प्रोजेक्ट रिपोर्ट जरुरी नाही मात्र व्यवसायाच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरवतो राष्ट्रीय पशुधन अभियान NLM योजनेप्रमाणे मोठा प्रकल्प खर्च नसल्यामुळे प्रक्रियेचे आवश्यक नाही

महत्वाच्या सूचना अर्ज करण्यापूर्वी खालील तयार करा आरक्षण प्रमाणपत्र जमीन कागदपत्रे भाडेपट्टा करार अनुभव प्रमाणपत्र बचत गट सदस्यत्व यामुळे अर्ज करताना अडचणी येणार नाहीत

निष्कर्ष

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी बेरोजगार युवक व महिला साठी मोठी संधी आहे 50 शेळ्या व 5 बोकड गट सारखे प्रकल्प राखून शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे योग्य वेळी कागदपत्राची तयारी करून अर्ज केल्यास मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवून पशुपालन व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी साधता येऊ शकते

Leave a Comment