राज्य शासनाने सुरू केलेली ही एक योजना आहे.”नमो लक्ष्मी योजना” या योजनेच्या माध्यमातून दहा लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, घेऊया या योजनेची माहिती.
नमो लक्ष्मी योजनेसाठी पात्र उमेदवार अर्ज करू इच्छित असेल तर ,आणि 50 हजार रुपये इतका लाभ घेऊ इच्छित असेल तर, या सरकारी योजनेची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे.
जर तुमच्या घरात मुली इयत्ता नववी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असेल तर अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
काय आहे नमो लक्ष्मी योजना
2 फेब्रुवारी 2024 मध्ये गुजरात राज्याचे मुख्यमंत्री श्री कनुभाई देसाई यांनी विधानसभेमध्ये 2024 25 चा बजेट सादर केले, त्यानंतर शाळेत जाणाऱ्या मुलींना मदत मिळावी यासाठी नमो लक्ष्मी योजनेची सुरुवात करण्यात आली.ही योजना विशेष स्वरूपात म्हणजे राज्यातील आर्थिक परिस्थितीने मागे राहिलेल्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी सुरू केली गेली.
नमो लक्ष्मी योजनेमार्फत चार वर्षांमध्ये पन्नास हजार रुपये इतकी मदत शासन ‘इयत्ता नववी’ ‘इयत्ता दहावी’ ‘इयत्ता अकरावी’ आणि ‘बारावी’ मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला मदत करणार म्हणजेच “इयत्ता नववी ते बारावी” शिकणाऱ्या विद्यार्थिनींना चार वर्षांमध्ये 50 हजार रुपये इतकी आर्थिक मदत होणार .
नमो लक्ष्मी योजनेचे उद्देश
1: नमो लक्ष्मी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेल्या मुलींना शिक्षणासाठी मदत व्हावी.
2: ही योजना यासाठी सुरू केली गेली आहे, की प्रत्येक विद्यार्थिनीचे अभ्यासात मन लागावे.
3: नमो लक्ष्मी योजनेत मध्ये इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळू शकते.
4: ही योजना सुरू करण्यामागचे कारण गुजरात राज्यातील प्रत्येक विद्यार्थिनीला शिक्षणासाठी पैशासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज न पडावी.
नमो लक्ष्मी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
1: अर्जदाराचे आधार कार्ड.
2: आई-वडिलांचे आधार कार्ड.
3: पत्ता.
4: जातीचा दाखला.
5: शाळेतील कागदपत्रे.
6: मोबाईल नंबर.
7: बँक अकाउंट नंबर.( आधार लिंक असलेला)
8: पासपोर्ट फोटो.