LPG subsidy Maharashtra update : राज्यातील लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे यामुळे अनेक दिवसांपासून गॅस सबसिडी कधी मिळणार अनुदानाचा निधी कधी वितरित होणार अशाप्रकारे विचारणा करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना आता निश्चित उत्तर मिळते आहे
Ujjwala Yojana Maharashtra योजनेअंतर्गत काय मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा पात्र महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ही सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागाकडून प्रस्ताव हाताळणी आणि निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होती आता अखेर या अनुदानासाठी आवश्यक निधीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे
नवीन जीआर नुसार मोठा निर्णय
17 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत (Pending Gas Subsidy ) प्रलंबित गॅस अनुदानाची दयक वितरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे या अनुदानासाठी अनुसूचित जाती साठी SC अनुसूचित जमाती साठी ST तसेच इतर पात्र महिलांसाठी निधी देण्यात येणार आहे
अनुसूचित जातीसाठी 30 कोटीचा निधी मुक्त
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी 30 कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा निधी 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात आला आहे 7 एप्रिल 2025 रोजी वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व निर्बंध नियम व मार्गदर्शक सूचनेचे पालन करूनच हा निधी वितरित केला जाणार आहे
अनुसूचित जमाती व ओपन प्रवर्गासाठी निधी उपलब्ध
जसे अनुदान अनुसूचित जाती साठी निधी मंजूर झाला आहे तसेच अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आदिवासी विकास विभागाकडून ओपन प्रवर्गातील पात्र महिलांसाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वेगळा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे प्रत्येक विभागात आपल्या पात्र लाभार्थ्यांसाठी प्रलंबित असलेले गॅस अनुदान तेल कंपन्यांना प्रतिपूर्ती स्वरूपात देईल आणि त्यानंतर हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल
प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत सध्याची सुविधा
प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत प्रत्येक सिलेंडर वरील 200 रुपयांची (Gas Subsidy Direct Beneflt Transfer) सबसिडी केंद्र सरकार तर्फे दिली जाते व्यतिरिक्त राज्य सरकार तर्फे माझी लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना अंतर्गत उर्वरित रक्कम अनुदान म्हणून लाभार्थ्यांना म्हणजेच महिलांनी सिलेंडरसाठी केलेल्या संपूर्ण खर्चाची रक्कम त्यांच्या अनुदान म्हणून परत मिळणार आहे
अनुदानाचे पैसे खात्यात कधी येईल
17 नोव्हेंबर 2025 चा जीआर नुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे विभागाने संबंधित तील कंपन्याकडे प्रतिपूर्ततेची प्रक्रिया सुरू करणे त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल सबसीडी वितरणाची प्रतीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाईल सरकारकडून पुढील अपडेट मिळताच ती माहितीही जाहीर केली जाणार आहे
जालना जिल्ह्यात 6.29 लाख शेतकऱ्यांना DBT मदत; 42% निधी वाटप तर उर्वरित अडकले
गाय गोठा अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत थेट आर्थिक साहाय्य मिळवण्याची सुवर्णसंधी
पीएम किसान योजनेत तब्बल 2.5 लाख शेतकऱ्याचा हप्ता थेट बंद होणार
Digital crop survey 2025-26 : डिजिटल क्रॉप सर्वेसाठी 26 कोटीची मंजुरी SC-ST शेतकऱ्यांना थेट लाभ
Free Gas cylinder scheme योजना बंद झाली का सबसिडी बंद झाली का
अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर योजनेबद्दल चुकीच्या अफवा पसरत होत्या काही म्हणत होती योजना बंद झाली सबसिडी मिळणं थांबले सरकारकडे निधी नाही पण आज प्रसिद्ध झालेल्या माहिती वरुन स्पष्ट होते की योजना बंद नाही अनुदानाचे वितरण सुरू राहणार सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे म्हणून सर्व पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा गॅस सिलेंडर अनुदान निश्चितपणे मिळणार आहे
कोठे पाहू शकता अधिकृत जीआर राज्य सरकार अधिकृत जीआर तुम्ही ते खालील संकेतस्थळावर पाहू शकता
Maharashtra.gov.in
निष्कर्ष : एकूण राज्य सरकारने महिला दिलेला दिलासा खूप मोठा आहे अन्नपूर्णा योजना तसेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर प्रधानमंत्री उज्वला सबसिडी उर्वरित संपूर्ण अनुदानाची परतफेड या सर्वांसाठी निधीची अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे हजारो महिलांना एक दिलासा मिळणार आहे पुढील अपडेट उपलब्ध झाल्यावर ती माहिती नक्की प्रदान केली जाईल धन्यवाद





