mahareshim abhiyan 2026 : तुती लागवड व रेशीम शेतीसाठी साडे चार लाखापर्यंत अनुदान संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे पारंपारिक शेती सोबतच शाश्वत आणि अधिक उत्पन्न देणारी पर्यायला चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत रेशीम अभियान 2026 राबवण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून तुती लागवड व रेशीम शेतीला साठी साडेचार लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार असून यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

रेशीम अभियान 2026 म्हणजे काय?

रेशीम अभियान हे राज्याच्या सहकार शाश्वत उद्योग व रेशीम उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारे विशेष अभियान आहे या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे रेशीम शेती राज्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे आणि पारंपारिक शेतीला वर असलेली अवलंबता कमी करणे

राज्यातील हवामान तुती लागवड व रेशीम शेतीसाठी अत्यंत अनुकूल असून अनेक शेतकरी या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे त्यामुळे शासनाने 2026 मध्ये या अभियानाला विशेष चालना दिली आहे नोंदणी प्रक्रिया व कालावधी रेशीम अभियान 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना 5 फेब्रुवारी 2026 ते 5 मार्च 2026 या कालावधीत नोंदणी येणार आहे नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा पोर्टल किंवा संबंधित योजनेची अर्ज करता येईल नोंदणी करताना शेतकऱ्यांना 500 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे

mahareshim abhiyan in marathi आवश्यक कागदपत्रे

नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील

  • सातबारा उतारा
  • आठ अ उतारा
  • चतुरसीमा नकाशा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो

कोणत्या योजनेअंतर्गत अनुदान मिळते

महारेशिम (mahareshim abhiyan 2026) अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खालील तीन योजनेचा माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे

मनरेगा (MGNREGA) अंतर्गत अनुदान

अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडीसाठी 895 मनुष्य दिनाची हजेरी दिली जाते

  • मजुरी पोटी 2,79,239
  • साहित्य खरेदीसाठी 1 लाख 53 हजार
  • एकूण अनुदान सुमारे 4,32,000

समग्री शी (silk samagra scheme)

समग्र शी (silk samagra Yojana) योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते

  • तुती लागवड 45 हजार प्रती एकर
  • सिंचन संच 45,000
  • रेशीम किटक संगोपन गृह 2 लाख 43 हजार 750
  • साहित्य 37,500
  • औषध व इतर खर्च मिळून
  • एकूण अनुदान सुमारे 3 लाख 75 हजार

बहुभूधारक शेतकऱ्यांना 2 एकर लागवडीसाठी सुमारे 5 लाख 62 हजार पर्यंत अनुदान मिळू शकते

पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2

पोखरा योजना अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांसाठी

  1. तुती लागवड 45 हजार
  2. किटक संगोपन ग्रह 2,43,000
  3. संगोपन साहित्य 36 हजार 375
  4. औषध व इतर खर्च 32 हजार 750
  5. एकूण अनुदान सुमारे 3 लाख 25 हजार 125

mahareshim abhiyan in marathi या योजनेसाठी शेतकऱ्यांना NDKSP पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल

अर्ज कुठे करायचा

  • गाव पोखरा योजना असल्यास NDKSP पोर्टल वर अर्ज करा
  • गाव पोखरा मध्ये नसेल मनरेगा किंवा समग्रशी योजनेअंतर्गत अर्ज करता येईल

निष्कर्ष. महारेशिम अभियान 2026 हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवणारी सुवर्णसंधी आहे तुती लागवड व रेशीम शेती कमी क्षेत्रात अधिक नफा देणारा शेती असून शासनाच्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांना खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Comment