डोक्यावर हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही पडणार दंड, सर्व्हिसबुकात नोंद होणार! पोलिस महासंचालकांचे आदेश : रस्त्यावर नियम तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार.Maharashtra Police Helmet Compalsary

Maharashtra Police Helmet Compalsary:राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात करण्यात आले आहे. पोलिसांकडून नियमांचे पालन व्हावे आणि जनतेसमोर आदर्श निर्माण व्हावा, यासाठी हे पाऊल उचलले आहे.

नियम मोडल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद करून कडक कारवाईचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे हेल्मेट न वापरणे पोलिसांना चांगलेच महागात पडणार आहे.

रस्ता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होतात. अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. शहरासह जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर दुचाकीला अपघात होतात. डोक्यावर हेल्मेट नसल्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हेल्मेट वापरणे सर्वांनाच बंधनकारक करण्यात आले आहे.

परंतु, या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. पोलिसांनी सक्ती केल्यास वाहनचालकांकडून त्यास विरोध केला जातो. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो.

परंतु, काही दिवसांत लोकांना हेल्मेटचा विसर पडतो. हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी

हेल्मेट वापरणे सर्वांनाच बंधनकारक आहे. पोलिसांनाही हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना पोलिसांसह सर्वांनीच हेल्मेट वापरणे गरजेचे असून, प्रत्येकाने आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावेत.

डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक

तीन हजार पोलिसांच्या डोक्यावर हेल्मेट दिसणार

शहरासह जिल्ह्यात तीन हजार पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.

या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या 3 डोक्यावर आता हेल्मेट दिसणार आहे. कारवाई टाळायची असेल तर पोलिसांना हेल्मेट वापरावे लागणार आहे.

यासाठी पोलिसांना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हेल्मेट न वापरल्यास पोलिसांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार असून, त्यांना दंड भरावा लागणार आहे.

हेल्मेट घाला, जीवन वाचवा

फोटो- व्हिडीओ व्हायरल झाल्यास कारवाई

पोलिस दुचाकीवरून प्रवास करत असतात. डोक्यात हेल्मेट न घालता पोलिसांचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पोलिसांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

४० टक्के अपघाती मृत्यू दुचाकीस्वारांचे

दुचाकीस्वाराचे अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. राज्यातील ४० टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे होत आहेत. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेट वापरल्यास अपघातातील धोके काहीअंशी कमी होतात.

पोलिसांनाही हेल्मेट सक्ती

पोलिसांना दुचाकीवरून फिरावे लागते. दुचाकीवरून फिरताना अनेक पोलिस कर्मचारी हेल्मेट वापरत नाहीत. पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याने नागरिकही कंटाळा करतात.

आता पोलिसांनाच हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरल्यास पोलिसांवरही कारवाई केली जाणार असून, सेवा पुस्तिकेत नोंद केली जाणार आहे.

यामुळे जारी केला आदेश

पोलिस प्रवास करताना हेल्मेट वापरत नसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलिसच नियमांचे पालन करत नाही, असा संदेश जनतेत गेला आहे. त्यामुळे नागरिकही हेल्मेट वापरण्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येते.

सेवापुस्तिकेच पदोन्नतीवरही परिणाम

पोलिसांनी प्रवास करताना हेल्मेट वापरले नसल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे.

त्याचा परिणाम पदोन्नती, सन्मान चिन्हांवरदेखील होणार आहे. हेल्मेट न वापरल्याची सेवापुस्तिकेत नोंद असल्यास सन्मानचिन्हे देताना अडचणी निर्माण होऊ शकतात.

Leave a Comment