या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या कुटुंबीयांना मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत 5 हप्त्यांमध्ये 98 हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार तर्फे देण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीमुळे गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण येणार नाही राज्यातील भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते राज्यातील मुलींचे शिक्षण सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2023-2024 अर्थसंकल्प विधानसभेत या योजनेची घोषणा केली होती.
- या योजनेचा मुख्य उद्देश असा की महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांच्या मुलींना त्यांच्या जन्मानंतर शैक्षणिक लाभासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून समाजातील मुलींना मुलांचे बरोबरीने स्थान दिले जाईल.
- रु. 5,000 जन्माच्या वेळी.
- रु 6,000 जेव्हा मुलगी इयत्ता पहिलीत प्रवेश घेते.
- रु.7,000 जेव्हा मुलगी इयत्ता सहावीत प्रवेश घेते.
- रु 8,000 जेव्हा मुलगी अकरावीत प्रवेश घेते.
- रु.75,000 मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर.
लेक लाडकी योजनेचे लाभार्थी
महाराष्ट् राज्याच्या या लेक लाडकी योजनेमध्ये फक्त राज्यात राहणाऱ्या मुलीच अर्ज करू शकतात आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
लेक लाडकी योजनेची पात्रता
- महाराष्ट्राचे राज्याच्या लेक लाडकी योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील मुलीच घेऊ शकता.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- राज्यातील केशरी आणि पिवळी शिधापत्रिकाधारक मुलींची कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया
- अर्जदार मुलीने लेक लाडकी योजनेचा ऑफलाइन फॉर्म अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करावा.
- डाऊनलोड केलेला ऑफलाइन फॉर्म पूर्ण भरावा आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत बाळगावीत.
- त्यानंतर स्थानिक अंगणवाडी केंद्रात जावे अंगणवाडी मदतनीस किंवा पर्यवेक्षक अर्जदाराचा सर्व तपशील अधिकृत पोर्टलवर अपलोड करेल आणि या योजनेत नावनोंदणी करेल.
लेक लाडकी योजना फॉर्म
स्टेप 1: लेक लाडकी योजनेचा फॉर्म पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या संकल्प संकेतस्थळावर जावे लागेल https://gr.maharashtra.gov.in
स्टेप 2: वेबसाईटवर केल्यानंतर तुम्हाला महिला बाल विकास विभाग निवडावा लागेल त्यानंतर उजव्या बाजूला लाडकी लेक असे टाईप करा आणि सर्च करा.
स्टेप 3: आता लेक लाडकी योजना शी संबंधित पीडीएफ डाउनलोड करण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल पीडीएफ डाऊनलोड करा येथे तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती आणि योजनेचा ऑफलाइन अर्ज पीडीएफमध्ये देण्यात आला आहे.