राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता महाडीबीटी पोर्टल स्कीम अंतर्गत पूर्वसंमती मिळेल का कारण निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सामान्यता नवीन मंजुरी अनुदान किंवा शासकीय लाभ वितरण थांबले जातात त्यामुळे बरेच शेतकरी पात्र ठरून ही पूर्व समितीच्या प्रतीक्षेत राहतात कृषी विभागाने यासंदर्भात एक स्पष्ट आदेश जारी केले आहे ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
कृषी आयुक्तालयाची अधिकृत सूचना दिनांक 6 नोव्हेंबर 2025
कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून 6 नोव्हेंबर 2025 रोजी एक अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली या पत्रकाद्वारे सर्व विभागीय कृषी संचालक आणि जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले विषय होता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्याबाबत सूचना
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना
सध्या राज्यात महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून खालील तीन प्रमुख योजना राबवल्या जात आहेत
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (Sub Misson on Agricultural Mechanization)
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) कृषी करण घटक
या योजनेअंतर्गत 2025-26 साठी लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात आली आहे
प्रधानमंत्री उज्वला योजना 2025 महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन आणि ₹300 सबसिडीची मोठी संधी
17,500 रुपयाची मदत नक्की कोणाला? जाणून घ्या पिकविमा नुकसान भरपाईचे नवे नियम
पूर्वसंमती तील मुख्य निर्णय
कृषी विभागाच्या पत्रकात नमूद केले आहे की आचार संहिता लागू होण्यापूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहिता कालावधीत पूर्वसंमती प्रदान करून अनुदान वितरित प्रक्रिया सुरू ठेवण्यात हरकत आहे याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्याची निवड आचारसंहितेपूर्वी झाली आहे आणि त्यांनी कागदपत्र अपलोड करून प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याबाबत सर्व लाभार्थ्यांना आता पूर्वसंमती दिली जाणार आहे
अनुदान वितरण परिणाम होणार नाही
या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण अनेक लाभार्थ्यांनी कृषी यांच्या यंत्रांची खरेदी बिल अपलोड आणि अर्ज पूर्ण केले आहेत त्यांची पूर्वसंमती व अनुदान वितरण प्रक्रिया आता निवडणूक आचारसंहिता अडणार नाही
कृषी विभागाने स्पष्ट सांगितले – की
आचारसंहितेपूर्वी मंजूर झालेल्या अर्जाच्या अनुदान रकमेच्या आता प्रक्रिया ला कोणताही हरकत नाही
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश
जर तुमचा अर्ज महाडीबीटी फॉर्म स्कीम (Mahadbt farmers scheme 2025) अंतर्गत मंजूर झाला असेल आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत समावेश झालेले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पूर्वसंमती ची प्रक्रिया आणि अनुदान वितरण नेहमीप्रमाणे सुरू राहील
निष्कर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली असली तरी महाडीबीटी योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या पूर्वसंमती व अनुदान वितरण प्रक्रियेवर कोणताही अडथळा येणार नाही कृषी विभागाने जारी केलेल्या निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अनुदान मिळवण्यासाठी ची प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे
हाच अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे महाडीबीटी पोर्टल वरील अर्ज तपासा आणि तुमची स्थिती जाणून घ्या कृषी विभागाकडून पुढील सूचना मिळाल्याच आम्ही ती माहिती लगेच शेअर करू
धन्यवाद





