मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच महिन्यांचे पैसे सगळ्यांना मिळालेले आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे हे पैसे मिळू शकणार नाहीत.
कारण लाडकी बहिण योजना हे सद्यस्थितीत निवडणूक आयोगाकडून बंद करण्यात आलेली आहे.
निवडणूक आयोगाने दिले आदेश
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र मध्ये, विधानसभा निवडणुक जाहीर केली. त्यानुसार राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सरकारला आचारसंहिता असताना मतदारांना प्रभावित करण्यात येणाऱ्या वित्तीय योजनांना बंदी करण्याचे निर्देश दिलेले आहे.
कधी मिळतील आता लाडकी बहीण योजनेचे पैसे
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला व बालकल्याण विभाग कडून देण्यात येणारी रक्कम थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना पात्र असलेल्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही.
योजनेवर बंदी आणण्याचा काय कारण आहे
मतदारांना आर्थिक लाभ देण्यात येणाऱ्या योजना तात्काळ बंद करण्यात याव्या, असे निर्देश निवडणुक निर्वाचन पदाधिकारी कार्यालयातून दिले आहेत.
लाडकी बहिण योजनेची पात्रता काय आहे
महाराष्ट्रातील महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे निवासी असणे गरजेचे होते. महिला अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असायला हवे होते. सर्व विवाहित, अविवाहित, परित्यक्ता आणि निराश्रित सर्व महिला यासाठी पात्र होते. अर्जदाराचे स्वतःच्या नावाने बँकेत अकाउंट हवे होते. अर्जदाराचे पारिवारिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावी.