बी ए एस एफ चे’इफिकॉन’ कीटकनाशक बाजारात दाखल |Efficon Pesticide

भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘बी ए एस एफ ‘या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीने स्वयं संशोधित व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इफिकॉन ‘हे एक नवीन कीटकनाशक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.हैदराबाद येथे एका कार्यक्रमात नुकतेच त्याचे अनावरण झाले आहे.

कापूस, भाजीपाला उत्पादनात भारत देश आघाडीवर आहे, पण रस शोषक किडीमुळे उत्पादकतेत 35 ते 40 टक्के घट येते ,त्यामुळे ही समस्या लक्षात घेता रसायनशास्त्रावर आधारित ‘इफिकॉन’ हे कीटकनाशक तयार केले आहे. ‘अक्सलिओन’ हा त्यातील मुख्य घटक आहे.

मावा, तुडतुडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण त्यांच्या वाढीच्या अवस्थेत हे कीटकनाशक काम करते.कापूस, मिरची ,टोमॅटो, वांगी, काकडी इत्यादी.पिकात त्यांची शिफारस आहे.फवारणीनंतर दीर्घकाळ याचा परिणाम राहतो.लेबल क्लेम नुसार वापरल्यास मित्र कीटक व मधमाशांसाठी हे सुरक्षित राहते.अशी माहिती पत्रकार परिषदेत श्री रेणुका यांनी दिली

जागतिक लोकसंख्या वाढ व हवामानात बदल, दुष्काळ, तापमान आदी संकटे आहेत ,यामुळे अन्नसुरक्षा निर्माण होण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेतकऱ्यांना शाश्वत उपाय देण्यासाठी ‘बी ए एस एफ’ ने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

‘इफिकॉन ‘हा त्याचाच भाग असून कोरिया ,ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ ते भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.विविध भागीदारी संस्थांसोबतही कंपनी कार्यरत असून विविध गुणधर्माच्या पीकजाती बियाणे डिजिटल तंत्रज्ञान यातही संशोधन सुरू आहे.

या औषधाचा वापर करून लवकरच शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाच्या लवकरच सुधारितपणे शेती करण्याचा एक मार्ग मिळू शकतो त्यामुळे इफिकॉन हा त्याचाच एक भाग असून शेतकरी या औषधाचा वापर करून आपल्या आपल्या शेती पिकाच्या कीटकनाशक व इतर जनाचा वापर करून लवकरच आपल्या शेती पिकाचे संरक्षण करू शकतो.

Leave a Comment