मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025” electric vehicle subsidy in maharashtra हे नवीन धोरण लागू करण्यात आलेले आहे.
📅 23 मे 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार, इलेक्ट्रिक दुचाकीपासून ते चारचाकी, ट्रॅक्टर, बस आणि मालवाहू वाहनांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये १५,००० रुपये ते २० लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
🔍 कोणत्या वाहनांना किती अनुदान मिळेल? electric vehicle subsidy in maharashtra
वाहनाचा प्रकार | वाहनसंख्या | अनुदानाची रक्कम |
---|---|---|
इलेक्ट्रिक दुचाकी | 1,00,000 | ₹10,000 प्रती वाहन |
इलेक्ट्रिक रिक्षा | 15,000 | ₹30,000 प्रती वाहन |
तीनचाकी मालवाहू | 10,000 | ₹30,000 प्रती वाहन |
इलेक्ट्रिक चारचाकी (इतर) | 10,000 | ₹1.5 लाख प्रती वाहन |
इलेक्ट्रिक चारचाकी (परिवहन) | 25,000 | ₹2 लाख प्रती वाहन |
हलकी मालवाहू वाहने | 10,000 | ₹1 लाख प्रती वाहन |
इलेक्ट्रिक बसेस (शहरी) | 1,500 | ₹20 लाख प्रती बस |
मोठी मालवाहू वाहने (N2, N3 श्रेणी) | 1,000 | ₹20 लाख प्रती वाहन |
शेतीसाठी ट्रॅक्टर/हार्वेस्टर | निश्चित नाही | ₹1.5 लाख पर्यंत प्रती वाहन |
🌱 या धोरणाचा उद्देश
राज्यातील प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून हे धोरण आखण्यात आले आहे. धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे:
- राज्यातील ३०% वाहने इलेक्ट्रिक करणे
- शहरी परिवहनात इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवणे
- चार्जिंग स्टेशन आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करणे
📝 electric vehicle subsidy 2025 नोंदणी प्रक्रिया व अटी-शर्ती
- या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
- पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर केले जाईल.
- यासोबतच प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पदकर (टोल) माफ करण्यात येणार आहे.
📄 GR कसा पाहाल?
23 मे 2025 रोजीचा हा शासन निर्णय (GR) तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.
🔔 शेवटचं आवाहन
मित्रांनो, electric vehicle subsidy in maharashtra या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करा. याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास, खाली कमेंट करा.