महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी (e-peek pahani) प्रकल्प सुरु करण्यात आला आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवणे आणि ती थेट सातबारावर (7/12 उतारा) दाखवणे आहे
ई पीक पाहणी प्रकल्प म्हणजे काय
हा प्रकल्प डिजिटल क्रॉप सर्वे आणि (Digital Crop Survey) ग्रीन ट्रक प्रणाली (Green Stack System) च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने शासन शेतकऱ्यांची जमीन किती आहे कोणती पीक घेतले आहे सिंचनाची सोय आहे का या सर्व बाबींची माहिती गोळा करते ही माहिती शासनाला नुकसान भरपाई अनुदान योजना किंवा इतर कृषी संबंधित योजनेमध्ये उपयोगी पडते म्हणजेच पुढील काळात मिळणाऱ्या सर्व सरकारी योजनेसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे
आपली ई- पीक पाहणी झाली आहे का
हे तपासायचे कसं शेतकऱ्यांना आपल्या शेतीची ई पीक पाहणी नोंद सातबारावर आली आहे हे तपासण्यासाठी सरकारने एक सोपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आपली चावडी पोर्टल ↗️ apli chavadi या खालील पद्धती वापरा
- सर्वप्रथम आपली चावडी पोर्टल या संकेतस्थळावर जा
- मुख्यपृष्ठावर e-peek pahani असा एक नवीन लॅब दिसेल त्यावर क्लिक करा
- तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडा नंतर दिलेला कॅप्चा कोड टाका
- तुमचा सर्वे नंबर किंवा खाते नंबर टाकून Search वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला त्या खातेदाराची सर्व माहिती दिसेल
- कोणत्या क्षेत्राची ई पीक पाहणी झाली आहे
- कोणते पीक लावले आहे
- क्षेत्र सिंचन संचित आहे का अशी असंचीत
- आणि ती नोंद सातबारावर दाखवली गेली आहे का
उदाहरणार्थ : माहिती जर तुमच्या खात्यात तीन गट असतील आणि त्याचं हे गटामध्ये वेगवेगळी पिके घेतली असतील तर त्याची तिन्ही नोंदी तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील त्यामुळे प्रत्येक गटाची तपासणी करणे आवश्यक आहे
ई- पीक पाहणी साठी अंतिम तारीख
खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी ची प्रक्रिया अजूनही सुरू आहे शेतकऱ्यांनी आपली सहाय्यक तलाठी किंवा संबंधित विभागामार्फत आपल्या शेतीची पाहणी करून घ्यावी साधारणपणे 31 ऑक्टोंबर पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे
निष्कर्ष
शेतकऱ्यांसाठी ई- पीक पाहणी ही एक महत्त्वाचे डिजिटल प्रक्रिया आहे यामुळे शासनाकडे तुमच्या शेतीची अचूक माहिती उपलब्ध राहते नुकसान भरपाई तसेच विमा अनुदान व इतर योजना मिळवताना कोणतीही अडचण येत नाही म्हणूनच आजच आपल्या ह्या आपली चावडी पोर्टल वर लॉग इन करून ई- पीक पाहणी चे नोंद सातबारावर आली आहे का हे तपासा





