कडक उन्हातही एसीसारखी थंड हवा, पंख्यासमोर ठेवला टॉवेल अन्…; देसी जुगाडचा भन्नाट VIDEO.Desi Jugaad for Summer Cooling Video

Desi Jugaad for Summer Cooling Video: आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. लहान मोठे जुगाड करून लोक अडचणीतूनही मार्ग शोधतात. सोशल मीडियावरही जुगाडासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उकाड्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड करताना दिसतात. सध्या असाच एक जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय, ज्यात एका काकांनी कडक उन्हात एसीसारखी थंड हवा खाण्यासाठी असा काही जुगाड केलाय की, ते पाहून तुम्हीही चकित व्हाल.

व्हायरल व्हिडीओत एका काकांनी उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी असा एक जुगाड केलाय की, ते पाहून तुम्हालाही जाणवेल की, यात काकींना फॅनमधून थंड हवा येण्यासाठी बुद्धीचा चांगलाच वापर केला गेलाय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात काकांनी स्टँड फॅन लावला आहे आणि त्याच्यासमोर त्यांनी एक टॉवेल टांगला आहे. फॅनसमोर ओला टॉवेल टांगला असेल, तर पंख्याची हवा टॉवेलवर जाऊन, टॉवेलच्या ओलाव्यामुळे फिरून मागे थंड हवा येऊ शकते.

त्यामुळे टॉवेल सतत ओला ठेवण्यासाठी त्यांनी एक चांगलीच ट्रिक वापरली आहे. त्यांनी टॉवेलजवळ एक पाण्याने भरलेली एक बाटली टांगली आहे आणि ड्रिप सेटमधील पाईपमधून ते पाणी सतत टॉवेलवर पडत आहे, जेणेकरून टॉवेल बराच काळ ओला राहील. त्यामुळे बाहेर कितीही कडक ऊन असेल तरी फॅनमधून बाहेर पडणाऱ्या हवेतून थंडावाच अनुभवायला मिळेल.

हा भन्नाट जुगाड व्हिडीओ imTrueIndia1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भावा, हा एक देसी जुगाड आहे.

त्यानं आपल्या मेंदूचा योग्य ठिकाणी वापर केला आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “एसी अल्ट्रा प्रो मॅक्स, या माणसानं काय जुगाड केला आहे, त्यानं खूप छान काम केलं आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले, “भावा, त्याला ऑस्कर दिला पाहिजे.”

देसी जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment