मित्रांनो, तूर, मूग, उडीद अशा पिकांसाठी अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या 100% अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून अर्ज करता येतो. या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.
पोर्टलवर गेल्यानंतर फार्मर आयडी टाकून लॉगिन करायचे आहे. आयडी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर करून ‘लॉगिन’ ऑप्शनवर क्लिक करून लॉगिन करायचे आहे.
तुमचा प्रोफाईल 100% भरलेला असावा. प्रोफाईल कसा भरायचा याची माहिती आपण याआधी घेतलेली आहे. लॉगिन केल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यामध्ये तुम्हाला बियाणे वितरण, प्रात्यक्षिक अशा बाबी दिसतील. त्यावर क्लिक करायचे आहे. जिल्हा आणि तालुका सिस्टीमवर दाखवलेला असेल. त्यानंतर घटक निवडायचा आहे.
प्रमाणित बियाणे वितरण आणि फ्लेक्सी घटक असे पर्याय दिसतील. यामध्ये ‘प्रमाणित बियाणे वितरण’साठी अर्ज करायचा आहे. पुढे, पीक प्रकारामध्ये ‘घडीत धान्य’ निवडायचे आहे. यात सोयाबीन निवडायचे आहे. (टीप: तीळ व भुईमूग रब्बीसाठी आहेत, खरीपासाठी नाहीत.)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कॉल करा 9850253015
यानंतर क्षेत्र निवडायचे. 0.40 हेक्टर म्हणजे 1 एकर क्षेत्र टाकायचे. किमान 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज करता येतो.
यानंतर ‘बाब जतन करा’ या पर्यायावर क्लिक करायचे. त्यानंतर विचारले जाईल की दुसरी बाब निवडायची आहे का? असल्यास ‘Yes’, नसेल तर ‘No’ करायचे.
‘No’ केल्यावर बाब जतन होते, पण अर्ज सादर होत नाही. अर्ज सादर करण्यासाठी “मुख्य प्रश्नावर अर्ज सादर करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर विचारले जाईल की तुम्ही आवडीनुसार बाबी निवडून एकत्रित अर्ज करू इच्छिता का? येथे ‘OK’ क्लिक करायचे आहे. पुढे, वरती ‘पहा’ या पर्यायावर क्लिक करायचे.
तुम्ही निवडलेली बाब दिसेल. त्याखाली “योजनेच्या अटी व शर्ती मला लागू राहतील” या पर्यायावर क्लिक करून “अर्ज सादर करा” वर क्लिक करायचे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कॉल करा 9850253015
जर यापूर्वी पेमेंट केलेले नसेल, तर ₹23.60 पेमेंट करावे लागेल. पेमेंटसाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, QR कोड, UPI वगैरे पर्याय येतील. QR कोड वापरून तुम्ही सहज पेमेंट करू शकता.
पेमेंट झाल्यानंतर अर्ज सक्सेसफुली सादर झाल्याचे दाखवले जाईल. एकदा अर्ज सादर झाला की, “घटक तपशील पहा” मध्ये तो अर्ज दिसेल.
त्यात ‘छानणी अंतर्गत अर्ज’, ‘लागू केलेला घटक’, ‘पूर्वी केलेले अर्ज’ याखाली सगळी माहिती उपलब्ध होईल.
महत्त्वाची बाब – या योजनेमध्ये लॉटरी नाही. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर योजना राबवली जाते. जिल्ह्यानुसार पात्र शेतकऱ्यांची निवड होते.
20 गुंठ्यांपासून 1 हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना भौतिक लक्षांकाच्या आधारे अनुदान दिले जाते.
अंतिम यादी 3 तारखेला जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे. त्याबाबतचे अपडेट्स लवकरच आपण घेणार आहोत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कॉल करा 9850253015